56 रुग्ण कोरोनामुक्त
अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यात आज रविवार दिनांक 25 जुलै रोजी कोरोनाच्या 56 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, उपचारा दरम्यान चार रुग्णाच मृत्यू झाला आहे . तर 56 रुग्ण कोरोना मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार सचिन शेजाळ यांनी दिली.
आतापर्यंत अलिबाग तालुक्यात 18 हजार 252 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 518 रुग्णांचा मृत्यू झाला असून, 16 हजार 936 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सद्यस्थितीत तालुक्यातील 798 पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असल्याची माहिती तहसील कार्यालयाकडून देण्यात आली आहे.