आरोपीला केले जेरबंद
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील वाडगाव फाटा येथे विकण्यासाठी 2 किलो 593.50 किलो ग्रॅम वजनाचा गांजा नेणार्या आरोपीला अलिबाग पोलिसांनी वाडगाव फाटा येथे पकडून ताब्यात घेतले. संबंधीत आरोपीला पोलिसांनी अटक केले असून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
याबाबतचे वृत्त असे की, अलिबाग पोलीस ठाण्याच्या हद्दीत 03 जूलै रोजी रोजी 18:08 मौजे वाडगाव फाटा येथील पटकादेवी मंदीराचे समोर अलिबाग-वडखळ जाणार्या रस्त्यावर कोळघर ता. अलिबाग येथील रहिवाशी असणार्या आरोपीला पोलिसांनी अडवले. त्याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यात 2 किलो 593.50 ग्रॅम वजनाचा नशाकारक व अंमलीपदार्थ, व गांजा असल्याचे आढळून आले. सदर गांजा तो वडखळ ते अलिबाग रोडवरील वाडगाव फाटा येथे विकी करण्यासाठी घेवुन जात असताना त्याच्या मोटार सायकलवर सापडला. सदर गुन्ह्यातील एकूण 31,000/- रुपये किमतीचा 2 किलो 593.50 ग्रॅम वजनाचा नशाकारक व अंमलीपदार्थ, गांजा व एकूण 10,000/- रुपये किमतीची एक काळया रंगाची बजाज कंपनीची अपाचे मॉडेल असलेली मोटार सायकल असा एकूण 41,000/- रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदर गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात आली आहे. याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक श्री.पाटील करीत आहेत.