कोल्हापूर | प्रतिनिधी |
अमेरिकेत आढळणारा दुर्मिळ असा अॅलगेटर जातीचा मासा कोल्हापूरमध्ये पंचगंगा नदीत सापडल्याचे समोर आले आहे. किशोर दळवी व रघुनाथ दळवी हे मासेमारी करत असताना त्यांच्या जाळ्यात हा दुर्मिळ मासा अडकला. अशाप्रकारचा दुर्मिळ मासा पंचगंगा नदीत सापडण्याची ही पहिलीच घटना असल्याचे सांगण्यात आले आहे.
सहसा हा ङ्गलिगेटरफ मासा अमेरिकेत गोड्या पाण्यात आढळून येतो. माशाचे तोंड हे काहीसे मगरीच्या तोंडासारखे दिसते. सुरूवातील मासा जाळ्यात अडकल्यावर हा नेमका कोणता मासा आहे? असा प्रश्न मासेमारी करणार्या दोघांना पडला होता. मात्र नंतर काही जाणकारांना विचारण्यात आल्यावर हा ङ्गलिगेटरफ जातीचा मासा असल्याचे समोर आले.