। पोलादपूर । शैलेश पालकर ।
पोलादपूर तालुक्यातील देवनाळे गावात काल सायंकाळी सातच्या सुमारास दरड कोसळली. यावेळी नुकतेच जेवायला बसलेल्या नागरिकांना तातडीने स्वतःचे संरक्षण करणे शक्य झाले नाही. त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला असून जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरडीत एकूण कितीजण अडकले याबाबत कोणतीही माहिती हाती लागलेली नाही. या दुर्घटनेत देवनाळेमधील 4 घरे भुईसपाट झाली. तसेच 10 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. गोवेले रस्त्यावरील बोरज साखर येथील पुल कोसळल्याने गोवेले सुतारवाडी येथे मदत यंत्रणांना पोहोचणे अशक्य.