। पाली/बेणसे । वार्ताहर ।
सुधागड तालुक्यातील पाली येथील अनुज सरनाईक याने आपल्या क्रीडा कौशल्याच्या जोरावर तालुक्याचे नावलौकिक उंचावले. 10 व्या राज्यस्तरीय पिंच्यांक सिल्याट स्पर्धेत सीनियर 75 ते 80 वजनी गटात पालीतील अनुज सरनाईक यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. हरियाणा व जम्मू काश्मीर येथे होणार्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी अनुजची निवड झाली आहे.
महाराष्ट्र पिंच्यांक सिल्याट असोसिएशनच्या वतीने 10 वी राज्यस्तरीय पिंच्यांक सिल्याट स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांमधील 350 खेळाडूंनी सहभाग घेतला होता. याआधी देखील अनुज सरनाईक यांनी पिंच्यांक सिल्याट स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्ध्येत सुवर्ण पदकासह अन्य पदक पटकावले आहेत. अनुजच्या सुवर्ण कामगिरीबद्दल भारतीय पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र पिंच्याक सिल्याट असोसिएशनचे सचिव किशोर येवले यांनी अनुजचे अभिनंदन केले.