खोपोली पोलिसांच्या मध्यस्थीने उपोषण मागे ; योग्य न्याय मिळाला नाहीतर मनसे उपोषणावर ठाम
खोपोली | संतोषी म्हात्रे |
महींद्रा सँनियो कपंनीतील ४८ कत्राटी कामगारांना कामावरून कमी केल्यामुळे कुटूंबावर उपासमारीची वेळ असून कंपनी व्यवस्थापनाच्या मुजोरपणा विरोधात मनसेने आक्रमकपणा घेत कामावर परत घेण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले होते. खोपोली पोलीसांनी कुठलीही नोटीस न देता अचानक उपोषण ठिकाणाहून उठविले त्यानंतर मनसेसैनिकांनी पोलीस स्टेशन कडे धाव घेतली असता पोलिस निरिक्षक शिरीष पवार यांनी मध्यस्थी केल्यामुळे उपोषण मागे घेतला आहे.तर कामगारांना योग्य न्याय मिळाला नाहीतर मनसे उपोषणावर ठाम असल्याची इशारा उपोषणकर्ते सतिष येरूणकर यांनी माध्यमांशी बोलताना दिला आहे.
महीद्रां सँनियो कपंनीतील कामगारांनी मनसेच्या सचिन गोळे याच्यां नेत्रुत्वाखाली थकित प्राँउडंट फंड मिळण्याकरीता कपंनी व्यवस्थापन व ठेकेदार याच्यां विरोधात आंदोलनाचे हत्यार उपसल्यामुळे व्यवस्थापनाने तात्काळ ५५ लाख रु प्राँवीडंटं फंड भरला. परंतु आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणा-या २५० कत्रांटी कामगारांमधील ४८ कत्रांटी कामगारांना कपंनीने कामावरुन काढुन टाकले. या करीता कपंनी व्यवस्थापनाने व ठेकेदाराने वेगवेगळ्या दबालतत्रांचा वापर करीत कामगारांचे आंदोलन दडपशाहीने बदं पाडले. मनसेचे सचिन गोळे याच्यांवर कायद्याच्या कचाट्यात अडकवुन कपंनी विरोधात गेट समोर आंदोलन न करण्याचे बधंन टाकले.
अशा परिस्थीतही खोपोलीतील मनसेचे कार्यकर्ते येरुणकर यांनी कपंनी व्यवस्थापन, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसिल कार्यालय, खोपोली पोलीस स्टेशन याच्यांशी पत्रव्यवहार करुन दि. १ सप्टेबंर रोजी उपोषणाचा अर्ज दिला. त्यास १५ सप्टेबंर पर्यंत कोणतही लेखी बंदी न आल्याने दि. १५ सप्टेबर रोजी सकाळी १० वा. मनसेचे येरुणकर हे वासरगं येथे कार्यकर्त्यासह उपोषणास बसले. काही वेळा नतंर खोपोली पोलीसांनी सदर ठिकाणी जाऊन येरुणकर यानां कोणतीही पुर्व सुचना न देता तेथुन जबरदस्तीने उचलुन पोलीस स्टेशनला आणले. या घटना मनसेच्या कार्यकर्त्यामध्ये वा-याच्या वेगाने पसरली. मनसैनिकांनी खोपोली पोलीस स्टेशनला धाव घेतली.
खोपोली पोलीस निरीक्षक पवार याच्यांशी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष जे.पी.पाटील,महेश सोगे,तालुकाध्यक्ष सचिन कर्णूक,खोपोली शहर अध्यक्ष अनिल मिंडे,उपोषणकर्ते सतिष येरूणकर,प्रदेश सदस्य बाळा दर्गे,अविनाश देशमुख यांच्यासह कार्यकर्ते या सदंर्भात चर्चा करत असताना पोलीस मात्र मनसैनिकाच्या कायदेशीर उपोषणला बेकायदेशीर ठरवत असतानाच अखेर उपस्थीत पत्रकार मेहबुब जमादार यांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणा-या मनसेची भुमिका आक्रमक पणे माडुंन कपंनी व्यवस्थापन व ठेकेदार याच्यां भुमिकेबाबत पोलीसांनी वस्तुस्थीती सांगितल्याने अखेर पोलीस नरमले. मनसेच्या उपोषणकर्त्यांसोबत कपंनी व्यवस्थापन , ठेकेदार यांची तात्काळ बैठक घेऊन दोन दिवसात तोडगा काढु अन्यथा तिस-या दिवशी उपोषण करु कामगारांची बाजु माडंण्याची भुमिक आपल्या न्याय हक्कासाठी खोपोलीतील पोलाद उत्पादक कपंनी महीद्रां सँनियो मधील कत्रांटी कामगारांनी ठेकेदार तसेच कपंनी प्रशासनाविरोधात आंदोलनाचे हत्यार उपसले.मनसे उपोषणामुळे महीद्रां स्यानियो प्रशासन हादरले, पोलीसांनी तत्वता मान्यता दिली.त्यामुळे कत्रांटी कामगारांबाबत बैठकिला न येणारे कपंनी व्यवस्थापन व ठेकेदार यांनी कामावरुन काढलेल्या कत्रांटी कामगाराबाबत सकारात्मक भुमिका न घेतल्यास पुन्हा मनसेच्या आंदोलनाला सामोरे जावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.