मुंबई | प्रतिनिधी |
नाटककार कै. बाळ कोल्हटकर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘बाळगंगा कामगार रंगभूमी’तर्फे एका छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी कोल्हटकरांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी प्रकाश दरवेशी (रंगभूमी अध्यक्ष), नाट्यसमीक्षक अरविंद सुर्वे आणि कामगार रंगभूमीचे नाटककार/दिग्दर्शक/नाट्यसमीक्षक सु.बा. सरपडवळ, दिग्दर्शक सुरेश खानविलकर, कविलेश सुदत्त, अभिलेश सुदत्त, निखिल, रूपेश व इतर कलावंत उपस्थित होते. हा कार्यक्रम कोरोना काळातील शासकीय नियमांचे पालन करून प्रभादेवी येथे आयोजित करण्यात आला होता.