। मुरुड जंजिरा । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील उंडरगाव येथील अविनाश नाईक यांच्या राहत्या घरात घुसून शिविगाळ व हाताबुक्क्याने मारहाण केल्याबद्दल चार जणांवर मुरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादी अपर्णा अविनाश नाईक यांच्या घरात रात्री दहाच्या सुमारास संगनमत करून गावातील आशिष म्हात्रे, किरण दत्ता म्हात्रे, निलेश भालचंद्र म्हात्रे, विराज नितीन गुंड यांनी अपर्णा यांच्यासह पती अविनाश व मुलांना शिविगाळ करून हाताबुक्क्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच पतीला मारण्याची धमकी दिली. मदतीसाठी शेजार्यांना जोरात आवाज दिला असता ते चारही जण तेथून पळून गेले. या चौघांविरोधात मुुुुरूड पोलीस ठाण्यात गुुुुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विलास आबेतकर करीत आहेत.