हुतात्मा नाग्या महादू कातकरी पुण्यतिथीनिमित्त अभियान
पाली/बेणसे | वार्ताहर |
हुतात्मा नाग्या महादू कातकरी पुण्यतिथीनिमित्त सिध्देश्वर आदिवासी वाडीतील महिलांनी स्वच्छता अभियान राबविले. स्वच्छतेची कास धरून महिला स्वतःहून पुढाकार घेत असल्याची बाब उल्लेखनीय आहे.
हातात झाडू घेऊन महिलांनी वाडीवरील सर्व परिसर स्वच्छ केला. तसेच ठिकठिकाणी वाढलेले गवत व झाडीझुडपे कापून टाकली. यावेळी महिलांची चांगली एकजूट पहायला मिळाली. हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांची पुण्यतिथी अशा विधायक प्रकारे साजरी केल्याबद्दल सरपंच उमेश यादव यांनी सर्व आदिवासी महिलांचे कौतुक केले.