। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ टेपआळी येथील मारुती मोरे यांच्या घरी सालाबादप्रमाणे वेगवेगळ्या आशयाची सजावट गणेशोत्सवामध्ये केली जाते. मारुती मोरे यांचे पुत्र योगेश यांनी यावर्षी कोरोनावर मात करण्यासाठी आवश्यक असलेली लसीकरण मोहिमेवरील सजावट करून लोकांमध्ये लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम राबविली आहे.
सर्वांनी लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन करणार्या या सजावटीच्या माध्यमातून कोरोनाला घालविण्यासाठी लसीकरण किती महत्वाचे आहे, याबाबत माहिती देण्यात आली आहे.लसीकरण जनजागृती मोहीम दाखविणार्या या सजावटीत योगेश मारुती मोरे यानेच मूर्ती साकारली असून सजावटदेखील त्यांनीच केली आहे. योगेश मोरे यास त्याचा भाऊ महेश याची ही सजावट साकारताना मदत झाली. जनजागृती करणारी ही सजावट पाहण्यासाठी मोठी गर्दी लोटली आहे.