। डोंबिवली । वार्ताहर ।
तब्बल 72 तासानंतर डोंबिवली येथे घडलेल्या प्रकरणातील पीडितेला कळवा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या तीन दिवसांत ज्या चाचण्या करणे गरजेचे होते त्या चाचण्या करून मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयातर्फे सांगण्यात आले. आरोपींची संख्या पाहता डोंबिवलीतील महाराष्ट्रातील सामूहिक बलात्काराची ही पहिलीच घटना मानली जाते. पोलिसांनी आतापर्यंत 29 जणांना गजाआड करण्यात यश मिळविले आहे. अटक आरोपींमध्ये दोघा अल्पवयीन तरुणांचाही समावेश असल्याचे उघडकीस आले आहे. तर यातील अन्य 4 जण अद्याप हाती लागले नसून पोलिस त्यांचाही कसोशीने शोध घेत आहेत.