सामन्यांच्या वेळापत्रकात बदल
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताविरूद्धच्या एकदिवसीय मालिकेपूर्वी श्रीलंका संघामधील अडचणी वाढत चालल्या आहेत. सपोर्ट स्टाफच्या दोन सदस्यांना करोना संसर्ग झाल्यानंतर आता श्रीलंकेच्या खेळाडूलाही करोनाने ग्रासले आहे. या संकटामुळे भारत-श्रीलंका मालिकेचे वेळापत्रक बदलावे लागले आहे. न्यूजवायरच्या वृत्तानुसार, श्रीलंकेचा फलंदाज संदुन वीरक्ककोडीला करोना झाला आहे. संदुन हा श्रीलंकेच्या डंबुला येथे असलेल्या शिबिरात सराव करत होता.
श्रीलंकेचा दुसरा संघ या सराव शिबिरात थांबला आहे. इंग्लंडहून परतलेल्या श्रीलंकेच्या खेळाडूंना भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत मैदानात उतरवले जाऊ शकत नाही. अशा परिस्थितीत श्रीलंका क्रिकेट बोर्डाने डांबुलामध्ये खेळाडूंचा एक नवीन संघ तयार केला होता. परंतु आता डंबुला येथे प्रशिक्षण घेत असलेल्या संदुनला कारोनाची लागण झाली आहे.
नवीन वेळापत्रकएकदिवसीय मालिकेचा पहिला सामना 18 जुलै रोजी होणार आहे. दुसरा सामना 20 जुलै आणि तिसरा सामना 23 जुलै रोजी खेळला जाईल. टी-20 मालिकेचा पहिला सामना 25 जुलै, दुसरा सामना 27 जुलै आणि तिसरा सामना 29 जुलैला खेळला जाईल.