मुस्लिम बांधवांनी जपली बांधिलकी
| महाड | जुनेद तांबोळी |
जुलै महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात आलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये रायगड जिल्ह्यातील ऐतिहासिक शहर असलेल्या महाड शहर व आसपासच्या गावचे सावित्री नदीच्या महापुरात अतोनात नुकसान झाले. राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला होता. सर्वधर्म भाव जपली जाणारी संस्कृती या मदतीदरम्यान दिसून आली असून पुणे शहरातील अंजुमन एतेहाद तंबोलियन जमात महाराष्ट्र राज्य व पुणे शहर तांबोळी मस्जित रविवार पेठच्या वतीने जीवनाश्यक साहित्याची मदत देण्यात आली आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाड, पोलादपूर, चिपळूण हे तालुके मोठ्या प्रमाणावर बाधित झाले होते. महाड शहरातील बाजारपेठेमध्ये सर्व दुकाने महापुराने आपल्या कवेत घेतल्याने व अनेक घरांना वेढा घालत्याने अनेक कुटुंबातील घरदार, संसार उध्वस्त झाले. पूरग्रस्तांना राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झाला होता. अनेक दानशूर नागरिक आपआपल्या परीने मदतीसाठी पुढे सरसावले होते. मुस्लिम बांधवांनी महापुरच्या नंतर मोठ्या प्रमाणावर मदतकार्याला सुरुवात केली होती. याच वेळी पुणे येथील अंजुमन एतेहाद तंबोलीयन जमात, महाराष्ट्र राज्य व पुणे शहर, तांबोळी मस्जित रविवार पेठ यांनी महाड वासीयांना धान्य, पाणी ,कपडे ,सह गॅस शेगडी सह विविध वस्तू रुपी मदत कार्य केले आहे.
महापुर ओसरल्यावर पाहिले तीन फेर्या, नंतर ऑगस्ट महिन्यात महाड शहरातील पूरग्रस्त कुटुंब, काही संस्थांना साहित्याची मदत केली आहे. नुकतेच मंगळवारी पुन्हा महाड मध्ये मदत वाटप करण्यात आले. या वेळी समीर भाई घोटवडेकर पुणे शहर उपाध्यक्ष ,जुबेर भाई पाडलिकर ,रफिकभाई चिंचोलीकर ,इम्रान भाई संगमनेर आले, ईनुस भाई चिंचोलीकर ,वसीम भाई वालेवाले, जाकीर भाई (पिंपरी चिंचवड) मोहम्मदभाई बोकुडी आदी पुणे तंबोली जमातीचे सदस्य उपस्थित होते. या मदतकार्यात जुनेद तांबोळी, असिफ तांबोळी, रमिज तांबोळी, इम्रान तांबोळी, नईम तांबोळी यांचे मोलाचे कार्य लाभले आहे. महाड शहरातील सर्व घटक समाजबांधवांना मदत करत इतर साहित्य महाड मधील सामाजिक संस्था असलेल्या दर्दमंद या संस्थेला देत त्यांच्या सामाजिक कार्याला हातभार लावला आहे.