चित्रा आस्वाद पाटील यांच्याकडूून विचारपूस
कुसुंबळे | वार्ताहर |
महाड पूरग्रस्तांसाठी झेप फौंडेशनच्या माध्यमातून नुकतीच भरीव मदत देण्यात आली. जि.प. सदस्या,झेप फाऊंडेशनच्या अध्यक्षा चित्रा आस्वाद पाटील यांनी फाऊंडेशनतर्फे नुकतीच या पूरग्रस्त भागांत जावून प्रत्यक्ष पूरग्रस्त लोकांना भेटी देऊन त्यांची विचारणा करीत त्यांना भरीव मदत केली.
यावेळी त्यांनी महाड येथील बौद्धवाडी, भोराव गाव, भोराव-कळंबेवाडी, गोंडाळे, लाडीवली, राजेवाडी या भागांत प्रत्यक्ष जावून लोकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी लक्षात घेतल्या. त्यांनी यावेळी 3 ते 20 वर्षे वयोगटातील मुला – मुलींना कपडे वाटप केले तर महिलांना साड्या व पुरुषांना शर्ट पँट तसेच टी शर्ट चे वाटप करीत मुलींना सैनिटरी पॅड व बिस्कीट पुडे इ. चे वाटप केले. तसेच झेप फाऊंडेशन अंतर्गत गावांतील लोकांना व इतर गावांना पाणी देण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या व्यतिरिक्त वापरण्याच्या पाण्यासाठी कायमस्वरूपी एक टँकर महाड येथे ठेवण्यात आलेला आह.
चिखल काढण्यासाठी सक्शन मशीन देखील झेप फाऊंडेशन कडून देण्यात आली आहे. यावेळी पूरग्रस्तांशी संवाद साधत असताना महिलांच्या भावना अनावर झाल्या व अश्रुंवाटे त्यांनी आपले दुःख व्यक्त करीत चित्रा पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून केलेल्या भरीव मदतीसाठी त्यांचे आभार मानले. चित्रा ताईंनी त्यांच्या अडचणी समजून घेत त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे त्या लक्षात घेऊन पुन्हा एकदा मदतीसाठी येण्याचे आश्वासित केले. विशेष म्हणजे म झेप म फाऊंडेशनच्या सर्व महिला सदस्या हे मदतकार्य करण्यासाठी चित्रा पाटील यांच्यासोबत उपस्थित होत्या.
यावेळी अलिबाग पं.स. सदस्या रचना निलेश थोरे पाटील, झेप फाऊंडेशन सदस्या संगीता माने, जिविता पाटील, साक्षी, समीक्षा, हर्षद इसाने, तेहसिन बूराने, रूही तांडेल इ. महिलावर्ग उपस्थित होता. याकामी हिरवळ प्रतिष्ठान अध्यक्ष किशोर धारिया, खरेदी विक्री संघ सभापती निलेश थोरे पाटील, शेकाप. ज्येष्ठ कार्यकर्ते माणगाव तालुका नामदेव शिंदे, निलेश थोरे मित्रमंडळ यांचे विशेष सहकार्य लाभले.