। रसायनी । वार्ताहर ।
रोटरी व रोटरक्ट क्लब ऑफ पाताळगंगा यांच्यावतीने गणेश उत्सवात दिड दिवस,पाच दिवस,सात दिवस आणि अनंत चतुर्दशीपर्यंत असणार्या रसायनी परिसरातील काही गणेश बाप्पांचे विसर्जन रिस येथील गणेश विसर्जन घाटावर करण्यात आले.
विसर्जनस्थळी आलेल्या भाविकांकडून गणेश घाट परिसर अस्वच्छ होत असतो.यासाठी रोटरी व रोटरक्ट क्लब ऑफ पाताळगंगा यांनी निर्माल्यकुंड तयार करून या कुंडात निर्माल्य टाकावे व प्लास्टिक वेगळ्या पिशवीत ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवकांनी आजूबाजूच्या परिसरात पडलेला प्लास्टिक कचरा संकलित करून त्याची योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली.
रायगड जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था निर्मल गणेशोत्सव साजरा करत आहेत.रोटरी व रोटरक्ट क्लब पाताळगंगा यांनी स्वच्छता व आरोग्य या दोन महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करून स्वयंसेवकांच्या सहकार्याने निर्माल्य व प्लास्टिक संकलन करून रिस गणेश घाट आसपासचा परिसर स्वच्छ व सुंदर सुरक्षित ठेवण्यासाठी सामाजिक भावनेने रोटरी व रोटरक्ट क्लब कार्य केले. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष गणेश काळे माजी अध्यक्ष भोसले,होनावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एन.डी.गुंड,परिसरातील स्थानिक लोकप्रतिनिधी,रोटरीचे स्वयंसेवक,गणेश भक्त या कार्यक्रमास उपस्थिीत होते.