। चिपळूण । प्रतिनिधी ।
लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील वीजपुरवठा अंडरग्राउंड केबलच्या माध्यमातून करण्यात येणार असून मार्च 2022 पूर्वी हे काम पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती कोकण विभागाचे अधीक्षक अभियंता देवेंद्र सायनेकर यांनी माध्यमांसह बोलताना दिली. लोटे परशुराम इंडस्ट्रीज असोसिएशने औद्योगिक वसाहतीमधील वीज पुरवठ्याच्या प्रश्नासंदर्भात विज बिल न भरून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर सप्टेंबर 2021 पासून काम करण्याचा निर्णय झाला होता. त्याप्रमाणे कामाला सुरुवात करण्यात आली.
- औद्योगिक वसाहतीमधील कंडक्टर वारंवार तुटतात त्यामुळे अखंड आणि स्वच्छ वीज पुरवठा उपलब्ध होत नाही. म्हणून संपूर्ण औद्योगिक वसाहतीमध्ये अंडरग्राउंड विद्युत वाहिन्याच्या माध्यमातून वीज पुरवठा करण्यात येणे, आवश्यक आहे.-डॉ. प्रशांत पटवर्धन