तक्का गणपती विसर्जन घाटावर घडली घटना
पनवेल | वार्ताहर |
ङ्गपुढच्या वर्षी लवकर याफ म्हणत पनवेल परिसरात शनिवारी गौरा गणपतीचे दिवसभरात शांततेत विसर्जन पार पडले. मात्र, सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास पनवेल परिसरातील तक्का येथील गणपती विसर्जन घाटात गणपतीचे विसर्जन करण्याकरिता पाण्यात उतरलेल्या दोन व्यक्तींना पाण्यात अंदाज न आल्याने बुडत होते. ही घटना लक्षात येताच पनवेल शहर पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक महेश पाटील यांनी जीवाची बाजी लावत त्या पाण्यात बुडणार्यांना वाचविले.
या धाडसी कामगिरीमुळे पाटील यांना वरिष्ठांनी कौतुकाची थाप दिली आहे. खाकी वर्दीतील माणसाने माणुसकीचे दर्शन घडविल्याने पोलिसांच्या संवेदनशीलतेची प्रत्यंतर आले. महेश पाटील यांनी केलेल्या कामगिरीमुळे तक्का येथील गणेशभक्त, रहिवाशांनी पाटील यांना धन्यवाद देत आभार मानले. त्याचबरोबर या धाडसी कामगिरीमुळे वरिष्ठांनी देखील पाटील यांच्यावर कौतकाची थाप दिली आहे.