टोक्यो | वृत्तसंस्था |
ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेमध्ये भारतीय तिरंदाज प्रविण जाधव याने रशियाच्या गलसान बझारझापोव्हला अनपेक्षित धक्का दिलाय. प्रविणने तिरंदाजीमध्ये जागतिक क्रमवारीत दुसर्या क्रमांकावर असणार्या गलसान बझारझापोव्हला हरवलं आहे. एलिमेनशन राऊण्डमध्ये प्रविणने ही भन्नाट कामगिरी केलीय. प्रविणने ही कामगिरी 32 जणांच्या पहिल्या फेरीत केली असून पदकापर्यंत पोहचण्यासाठी त्या अजून किमान दोन विजय आवश्यक आहेत.
नेदरलँडमध्ये 2019 साली पार पडलेल्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाने सांघिक स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करत रौप्यपदकाची कमाई केली होती. नॉर्वे, कॅनडा, चीन तैपेई, नेदरलँड यांसारख्या मातब्बर संघाला नमवत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. मात्र अंतिम फेरीच चीनसमोर त्यांना पराभव स्विकारावा लागलेला. या संघामध्ये तरुणदीप राय, अतानु दास या मातब्बर खेळाडूंसोबत महाराष्ट्राच्या प्रविण जाधवनेही आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला डंका वाजवला होता. सातारा जिल्ह्यातल्या सरडे गावातून आलेल्या प्रविणचा प्रवास हा सर्वांनी प्रेरणा घेण्यासारखा आहे.