नागरिकांनी मानले प्रीतम म्हात्रे यांचे आभार
पनवेल | प्रतिनिधी |
साईनगर येथून कळंबोलीला कर्नाळा स्पोर्ट्समार्गे जाण्यासाठी पनवेल महानगरपालिकेच्या अंतर्गत कच्चा रस्ता आहे. सदरचा रस्त्याच्या आजूबाजूला अपटाऊन अवेन्यू, सुशील ब्लॉसम, दुर्वांकुर, सुशील रुक्मिणी इमारती आहेत. सदर इमारतीत एकंदरीत हजार ते बाराशे लोकवस्ती आहे. हा रस्ता साईनगर वासियांना पनवेलच्या बाहेर जाण्यासाठी सोयीचा असल्याने या रस्त्यावर सतत रहदारी असते. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले त्यामुळे तेथील रहिवाशांनी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचे आभार मानले.
पावसाळ्यात सदर रस्त्यावर आजूबाजूच्या प्लॉटवरील पाणी साचत असल्यामुळे बरेच ठिकाणी रस्ता फुटलेला आहे, त्यामुळे त्या ठिकाणी पावसाचे पाणी साचून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तेथे राहणार्या रहिवाशांनी पत्राद्वारे प्रीतम हात्रे आणि पनवेल महानगरपालिका यांना सदरची समस्या सांगितली. त्यांनी या रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष घालून सदर खड्डे त्वरित भरून देण्यास सहकार्य करून त्या विभागातील रहिवाशांची सदर रस्त्यावरील प्रवासादरम्यान होणारी गैरसोय टळली आहे.
याप्रसंगी स्थानिक रहिवासी शेकाप युवानेते मंगेश अपराज, अविनाश मकास, रोहन गावंड, भाई म्हात्रे, अशोक म्हात्रे व सोसायटीमधील रहिवासी उपस्थित होते. रस्ता दुरुस्तीचे काम सुरू केले, त्यामुळे तेथील रहिवासी यांनी प्रीतम म्हात्रे यांचे आभार मानले.