कानसे वाडीतील कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल
। म्हसळा । वार्ताहर ।
तालुक्यातील खेड्यापाड्यात चाललेल्या विकासाला प्रभावित होऊन घोणसे ग्रामपंचायतीत निवाची वाडी येथील शिवसेनेच्या कार्यकर्त्यासहित ग्रामस्थांनी आ. अनिकेत तटकरे, सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्षा रेश्मा कानसे, गण अध्यक्ष अनिल बसवत, रमेश कानसे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षात प्रवेश केला.
यावेळी जनार्दन खेडेकर, संदीप खेडेकर, उत्तम महाडिक, संदेश खेडेकर, दीपक खेडेकर यांच्या समवेत अन्य ग्रामस्थांनी प्रवेश केला. तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे जवळ येवू लागले तशी राजकीय उलथा पालथही सुरु झाली असल्याचे निदर्शनास येत आहे. घोणसे ग्रामपंचायत अंतर्गत खासदार, पालकमंत्री, आमदार यांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करण्यासाठी कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या निधीतून ग्रामपंचायती परिसरात सर्वसामान्य जनतेला हवे असणारे विकासकामे, आरोग्य विषयक शिबीर, लसीकरण मोहीम राबवून विकासकामाचा छाप दिसल्यामुळेच आज निवाची वाडीने प्रवेश केल्याचे सरपंच तथा राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा रेश्मा कानसे यांनी सांगितले.