। अलिबाग । वार्ताहर ।
महाराष्ट्र शासनाने ताडी अनुज्ञप्ती मंजुरी व नुतणीकरण करण्याकरीता पाच वर्षाचा एकत्रित कालवधी निश्चित करुन पाच वर्षाच्या कालावधीसाठी ई लिलाव निविदा आणि नुतणीकरण नुसार सन 2021- 22 या वर्षी लिलाव निविदा पध्दतीचा अवलंब करुन पाच वर्षाच्या कालावधीसाठी ताडी विक्री अनुज्ञप्ती मंजुरी कराव्यात व तद्नंतर त्यापुढील चार वर्ष दरवर्षी दुकानाच्या किमंतीमध्ये 6 टक्के करुन नुतणीकरण करण्यात यावे असा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार रायगड जिल्ह्यात राज्य शुल्क उत्पादन शुल्क रायगड अलिबाग या विभागाामार्फत सन 2021-22 या कालवधी करीता 176 ताडी दुकानांचा ई- लिलाव निविदा पध्दतीने लिलाव होणार असून त्याची माहिती ुुु.ारहरींशपवशीी.र्सेीं.ळप या संकेतस्थाळावर 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता उपलब्ध होणार आहे. तरी ईच्छूकांना वरील संकेतस्थळावर भेट देवून त्या प्रक्रियेत भाग घेता येईल. याबाबत अधीक माहिती अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क रायगड अलिबाग व सर्व विभागीय निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांच्या कार्यालयात उपलब्ध होईल.