। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटना व दक्षिण रायगड हितरक्षक संघटनेच्यावतीने पाली सुधागड पोलीस ठाण्याचे नवनिर्वाचित सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम पवार यांची सोमवारी (दि.30) भेट दिली तसेच त्यांचे स्वागत करून सर्व आदिवासी बांधवांनी व संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांनी त्यांच्याशी सुसंवाद साधला.
त्यावेळी पाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय तायडे उपस्थित होते. खालापूर पोलीस ठाण्यात सेवेत असणारे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राम पवार यांची सुधागड पाली येथे बदली झाली. यावेळी रायगड जिल्हा एकलव्य आदिवासी संघटनेचे अध्यक्ष पत्रकार भिवा पवार, दक्षिण रायगड आदिवासी हितरक्षक संघटनेचे उमेश जाधव, वन मित्र राम कोळी, बबन कोळी, संजय कोळी, दिनेश पवार, राम कोळी, मारुती जगताप, सुरेश जाधव, गणेश जाधव, सुरेश पांडू जाधव इत्यादी आदिवासी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.