रत्नागिरी विमानतळासाठी 100 कोटी
रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
मुंबई विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक रत्नागिरी उपकेंद्रासाठी दोन कोटी, राज्यातील महापुरुषांशी संबंधित दहा शाळांमध्ये जिल्ह्यातील दोन शाळांचा समावेश असून, त्यांना प्रत्येकी एक कोटीचा निधी मिळणार आहे. रेवस ते रेड्डी या सागरी महामार्गासाठीही भरीव तरतूद करण्यात आली. रत्नागिरी विमानतळावरून खासगी प्रवासी वाहतुकीचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. धावपट्टीचे काम पूर्ण झाले असले तरी विमान पार्किंग आणि काही यंत्रणा उभारण्यासाठी भूसंपादन आणि नवीन बांधकामासाठी निधीची गरज होती. या अर्थसंकल्पात विमानतळाच्या भूसंपादन व बांधकामासाठी 100 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.