। वाघ्रण । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील भात उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेली वाघ्रण पंचक्रोशीतील शेतकर्यांच्या पेरण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. पण येथील शेतात कबूतरांचा अतोनात त्रास होत असल्याचे दिसून येत आहे.
येथे वाघ्रण, फोफेरी, मांड, वखार, नारंगी, रांजणखार, शिरवली, चरी, कोपर, खिडकी इत्यादी गावांच्या खारभूमी शेतकर्यांचा समावेश आहे. येथे सर्वांनी पेरण्या केल्या असून पाऊस अधून-मधून हजेरी लावताना दिसत आहे. परंतु पावसाचा समतोल बिघडला तर भात पेरणीच्या रोपांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. तसेच कबूतर आणि बरेचसे इतर उनाड पक्ष्यांचे थवेच्या थवे रोपांवर बसून उगवलेल्या पिकांचे नुकसान करीत आहेत.