| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यातील चाकरमानी, ग्रामस्थ आणि पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेली कल्याण-डोंबिवली ते पाली एसटी बस सेवा सोमवारी (दि. 8) सुरू करण्यात आली आहे. या बसचे पाली येथे आगमन होताच स्थानिक शिवसेना पदाधिकारी आणि नागरिकांच्या वतीने अत्यंत उत्साहात आणि जंगी स्वागत करण्यात आले.
उपस्थित शिवसेना जिल्हा समन्वयक रायगड राजेंद्र राऊत, अनुपम कुलकर्णी, ओमकार खोडागळे, विनायक जाधव, अवजड वाहतूक सेना प्रमुख शरद फोंडे, सुबोध पालांडे आदी शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वाहतुक नियंत्रक, बसचे चालक आणि वाहकांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी मोठ्या संख्येने प्रवासी, स्थानिक नागरिक, महिला आणि लहान मुले देखील या सुविधेचा आनंद घेण्यासाठी आणि स्वागत करण्यासाठी उपस्थित होते. ही बस सेवा सुरू झाल्यामुळे संपूर्ण सुधागड तालुक्यातून आनंद व्यक्त केला जात असून, प्रवाशांनी प्रशासनाचे आणि पाठपुरावा करणाऱ्या लोकप्रतिनिधींचे आभार मानले आहेत.
शिवसेना रायगड जिल्हा समन्वयक राजेंद्र राऊत यांनी परिवहन मंत्र्यांकडे ही सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. ही बस सेवा पुन्हा सुरू झाल्यामुळे आता प्रवासी, विद्यार्थी आणि पर्यटकांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.
असे आहे बसचे वेळापत्रक
कल्याण (विठ्ठलवाडी) येथून सुटण्याची वेळ: सकाळी ठीक 8:30 वाजता.
पाली येथून परतीची वेळ दुपारी ठीक 1:30 वाजता







