पेपर फोडणाऱ्याला 10 वर्षाचा तुरूंगवास व एक कोटीपर्यंतचा दंड
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
गेल्या काही दिवसांमध्ये पेपरफुटीची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. या प्रकरणावर रोख लावण्यासाठी संसदेत सोमवारी विधेयक सादर करण्यात आले. या विधेयकांचा उद्देश प्रमुख परीक्षांमधील पेपरफुटी रोखणे आहे.
या विधेयकात पेपरफुटीच्या प्रकरणात किमान तीन ते पाच वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर संघटीत गुन्हेगारीसाठी, विधेयकात 5 ते 10 वर्षांच्या शिक्षेची तरतूद आहे. दुसऱ्याच्या जागी परीक्षेला बसल्यास कठोर शिक्षेची आणि दंडाचीही तरतूद करण्यात आली आहे. हा कायदा कडक झाल्यास पेपर लीक प्रकरणांना आळा बसेल त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. त्याचबरोबर कायदा कडक केल्यास परीक्षांमधील हेराफेरी थांबेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. पेपरफुटीबरोबरच कॉपीलाही आळा बसू शकतो. पेपरफुटीमुळे अनेक राज्यांमधील परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत लाखो उमेदवारांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
विधेयक काय आहे? सर्व गुन्हे अजामीनपात्र आहेत. 3 ते 5 वर्षे कारावास 10 लाख ते 1 कोटी रुपये दंड तपासाचा खर्चही भरावा लागणार संघटना किंवा गट सहभागी असल्यास मालमत्ता जप्त