पनवेल वगळता सर्व तालुक्यात 20 हुन कमी रुग्ण, 13 जणांचा मृत्यू तर 290 कोरोनामुक्त
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिलासादायक वृत्त म्हणजे पनवेल मनपा वगळता आज सर्वच तालुक्यात 20 हुन कमी रुग्ण आढळले आहेत तर तळा आणि पोलादपूर तालुक्यात एकही रुग्ण आढळला नाही. आज शनिवार दिनांक 31 जुलै रोजी नव्याने 157 रुग्णांची नोंद झाली असून उपचारादरम्यान 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 290 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
शनिवारी नव्याने जिल्ह्यात पनवेल मनपा 71, पनवेल ग्रामीण 19, उरण 3, खालापूर 9, कर्जत 5, पेण 7, अलिबाग 19, माणगाव 8, रोहा 5, मुरुड 1, श्रीवर्धन 2, म्हसळा 1, सुधागड 1, महाड 6 असे 249 रुग्ण आढळले. तर तळा व पोलादपूर तालुक्यात आज एकाही नविन रुग्णाची नोंद झाली नाही. तसेच अलिबाग तालुक्यात 6, महाड तालुक्यातील 4,उरण मध्ये 2 तर खालापूर तालुक्यात एक अशा 13 रुग्णांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.
आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 1 लाख 60 हजार 120 संसर्गित रुग्णांची नोंद झाली असून त्यापैकी 1 लाख 53 हजार 180 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर उपचारादरम्यान 3 हजार 977 रुग्णांचा मृत्यू झाला. सद्यस्थितीत 2 हजार 963 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.