सरकारी कार्यालयात, रस्त्यांच्या विजेचा वापर
| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरान शहरातील सर्व कचरा संकलित करताना ओला कचरा सुका कचरा असे वर्गीकरण करून ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करणारे रायगड जिल्ह्यातील पहिले पर्यटनस्थळ आहे. येथील रस्ते व शासकीय कार्यालयांना पुरवठा केला जातो माथेरानमध्ये पर्यावरण मुक्त गाव राखण्याकरता अहोरात्र कचरा संकलनाचे काम कर्मचारी करीत असतात.
माथेरान हे पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्यामुळे येथे सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी आहे त्यामुळे घनकचरा व्यवस्थापनाचे काम हे मानवी श्रमाद्वारे केले जाते. माथेरानमध्ये दररोज 3 टन कचरा निर्माण होते. यामध्ये 2 टन ओला व 1 टन सुका कचरा असतो. कचरा संकलन करण्यासाठी वाहतूक करण्यासाठी हाताने ओढणाऱ्या गाड्यांचा वापर केला जातो. माथेरान हे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असल्यामुळे रिकाम्या प्लास्टिक बॉटल मोठ्या प्रमाणात तयार होत असून, नगरपरिषदेमार्फत सर्व प्लास्टिक बॉटलचे संकलन करण्यात येते आणि त्यावर MRF सेंटर येथे बेलिंग मशीनद्वारे प्रक्रिया करण्यात येते.
2007 मध्ये नगरपालिका प्रशासनाने ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मिती करून तिचा वापर सुरू केला अशा प्रकारचा प्रकल्प माथेरानमध्ये आज ही सुरू आहे व या विजेचा वापर पालिका प्रशासन सरकारी कार्यालयात व रस्त्यांच्या विजेसाठी करीत आहे. माथेरानमध्ये कचरा संकलनासाठी ठेकेदारी पद्धतीने 60 कर्मचारी असून, कायमस्वरूपी 27 कामगार आहेत. यातील महिला कर्मचारी रोज घरोघरी जाऊन ओला व सुखा कचरा संकलित करीत असतात व स्थानिकांना घरोघरी क्यूआर कोड दिलेले आहेत त्याचाही वापर केला जातो.
माझ्या नगराध्यक्ष काळात 2007 मध्ये बायोगॅस प्रकल्प सुरू करून ओला कचरा नष्ट करण्याचा प्रकल्प राबविला होता. जो आजही सुस्थितीमध्ये सुरू आहे अशा प्रकल्प त्या काळात राबविणारी माथेरान पहिली नगरपालिका होती.
अजय सावंत
माजी नगराध्यक्ष







