| सुकेळी । वार्ताहर ।
जे.के.बिल्डिंग्ज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व अखिल गावदेवी सार्वजनिक शारदोत्सव समिती नाना चौक ग्रॅड रोड, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जिल्ह्यातील कर्जत, पनवेल, सुधागड, इंदापूर, तळा रोहा तालुक्यातील आदिवासी वाड्यातील गरीब व गरजु विद्यार्थ्यांना शाळेय साहित्यांचे मोफत वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमांतर्गत रोहा तालुक्यातील नागोठणे परिसरात वांगणी, ऐनघर, वाघ्रणवाडी, खैरवाडी, वेताळवाडी,घोगरकरवाडी, गणपतवाडी, चिकणी आदिवासी वाडी,वणी, पाटणसई आदिवासीवाडी आदि गावातील व वाड्यांमधिल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी अनुप गावंड, संजय बागकर, समीर कलगड, पांडुरंग बागकर, मयेकर, श्रीकांत माळकर, संदेश बाजे, संजय कदम, मनोज शिरसे यांच्या सौजन्याने करण्यात आले.