मुंबई

राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोठी भूमिका वठवलेले शिवसेनेते नेते, खासदार संजय राऊत यांनी आता राष्ट्रपतीपदासाठी मोर्चेबांधणी करण्याच्या कामाला लागले आहेत. सन 2022 मध्ये होणार्‍या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या नावाचा विचार करावा, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. 2020 साली राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचे नाव निश्‍चित करण्यासाठी आमच्याकडे आवश्यक तेवढे संख्याबळ असेल असा दावाही राऊत यांनी केला आहे. याबाबत लवकरच रणनीती आखली जाईल असेही राऊत म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली होती. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून मला वाटते की सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून त्यांचा नावाचा विचार करावा, असे राऊत म्हणाले.

 

अवश्य वाचा