रेवदंडा-महेेंद्र खैरे- अलिबाग तालुक्यातील थळ समुद्रातील किल्ले उंदेशी येथे तोफगाडा लोकार्पण सोहळा सहयाद्री प्रतिष्ठाण अलिबाग विभागाचे वतीने रविवार दि. 5 जानेवारी रोजी मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत संपन्न झाला. या किल्ले उंदेरी येथील तोफगाडा लोकार्पण सोहळयास सहयाद्री प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंंडे यांचे बहुमूल्य मार्गर्शन व सहकार्य लाभले.

किल्ले उंदेशी येथे तोफगाडा लोकार्पण सोहळयास मुख्य वन अधिक्षक महाराष्ट्र सुनिल लिमये, मराठी चित्रपट सृष्टी दिग्दशर्र्क अभिजीत पानसे, नागाव ग्रा.प.सरपंच निखिल मयेकर, नागाव ग्रा.प.सदस्या हर्षदा मयेकर, आदी प्रमुख मान्यवर तसेच मोठया संख्येने सहयाद्री प्रतिष्ठाणचे दुर्ग सेवक यांची उपस्थिती होती.  किल्ले उंदेशी येथील तोफगाडा लोकार्पण सोहळा शाहीर फणसे यांचा सुमधूर पोवाडा, ढोल-ताश्याचा आवाज, शाळकरी मुलांच्या लेझीमचा गजर,आणि सहयाद्री प्रतिष्ठाणच्या दुर्गसेवकाचा उत्साहाच्या उधाणाने अप्रतिम ठरला. शेकडो वर्ष  ऊन,वारा, अन पाऊस तसेच समुद्राची दमट हवामान यांच्या दोन हात करीत अस्तित्व टिकवून ठेवणार्‍या तिन तोफाना तोफगाडे बसविण्यात आले. या तोफगाडयाचे लोकार्पण सोहळा मान्यवरांचे हस्ते संपन्न झाला.

तत्पुर्वी सकाळी आठ वाजता थळ येथील काळभैरव मंदिर ते किल्ले उंदेरी असा भव्य  शिवप्रतिमेचा पालखी सोहळा मोठया संख्येने उपस्थित सहयाद्री प्रतिष्ठाणच्या दुर्गसेवकानीं मोठया दिमाखदारपणे पार पाडला. यावेळी ढोल-ताश्याचा गजर, दुर्गसेवकांचा उत्साह व शिवप्रतिमेचा  भव्य पालखी सोहळा नसानसात चैतन्य निर्माण करीत होता. या उंदेरी किल्ला लोकार्पण सोहळयाचे आयोजक सहयाद्री प्रतिष्ठाण अलिबाग यांनी केले होते. यावेळी सहयाद्री प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे यांचे मार्गदर्शनाखाली सहयाद्री प्रतिष्ठाणचे जिल्हा अध्यक्ष गणेश रघुवीर, तसेच तालुका अध्यक्ष संजय पाडेकर यांच्यासह दुर्गसेवकांनी अपार मेहनत घेत किल्ले उंदेशी येथे तोफगाडा लोकार्पण सोहळा मोठया थाटात पार पाडला. 

 

 

 

अवश्य वाचा

मुंबई : डे अँड नाईट