माथेरान,

 माथेरानला निसर्गाने आमूलाग्र वनसंपदा मुक्तहस्ताने बहाल केलेली असताना याबाबत बहुतांश नागरिक हे काहीही सोयरसुतक नसल्याप्रमाणे आणि याबद्दल आपुलकी वाटत नसल्याने नेहमीच दुर्लक्ष करीत असतात. या वनराईच्या गारव्यामुळे इथे पर्यटक येत आहेत. दिवसेंदिवस ही वनराई विविध कारणांमुळे लोप पावत चालली आहे. हिचे रक्षण करणे हे प्रत्येक नागरिकांचे आद्यकर्तव्य आहेच. यासाठी स्वतःच पुढाकार घेऊन खुद्द नगराध्यक्षा प्रेरणा प्रसाद सावंत यांनी येथील नौरोजी उद्यानात वड आणि पिंपळाच्या रोपांची लागवड केली आहे.

सायंकाळी पर्यटक हमखास या उद्यानाला भेट देऊन आपला वेळ क्षणभर विश्रांतीसाठी घालवत असतात. त्यामुळेच या उद्यानात गारवा असावा जेणेकरून या भागातील व्यवसायिक यांनाही याचा लाभ होऊ शकतो यासाठी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत यांनी या उद्यानावर बारकाईने लक्ष केंद्रित केले आहे.   त्याचप्रमाणे नगराध्यक्षा यांनी आपल्या प्रभागातील पंचवटी नगर मधील मोकळ्या जागांवर भविष्यात अतिक्रमण होऊ नये यासाठी तिथे छोटे उद्यान उभारले आहे.बहुतांश ठिकाणी अशाप्रकारे नगरपरिषदेच्या,तसेच वनखात्याच्या भूखंडावर अतिक्रमण वाढत चालली आहेत. ती नगरपरिषदेने आणि वनखात्याने काढून घ्यावीत जेणेकरून सातत्याने होत असलेल्या अतिक्रणामुळे भविष्यात शासकीय भूखंड दिसणार नाहीत.

माथेरान पालिकेतर्फे वृक्षारोपण मोहीम

माथेरान,वार्ताहर

अवश्य वाचा