मुरुड

  मुरुड तालुक्यातील डोंगरी,आंबोली व एकदरा गावात दूषित पाण्यामुळे उलटी जुलाबाची साथ सुरु झाली आहे.ही संख्या दिवसागणिक वाढत असून आरोग्य खाते जागे झाले असून रुग्णांची काळजी घेण्यात व्यस्त झाली आहे. 

  डोंगरी, आंबोली व एकदरा या तिन्ही गावांना आंबोली धरणातील पाण्यातून पाणी पुरवठा होतो.आंबोली धरणातील पाणी गेले कित्येक वर्ष साचलेले असून या धरणातील गाळ सुद्धा गेले कित्येक वर्ष साफ न केल्यामुळे या पाण्याला चिखलाचा वास व सदरचे पाणी गढूळ येत असून असंख्य ग्रामस्थ हे पाणी पिण्यास वापरल्यामुळे अनेक लोकांना उलटी जुलाबाची साथ सुरु झाली असल्याचे ग्रामस्थांनी  सांगितले आहे.

 उलटी जुलाब हे लहान मुले व वृद्ध लोकांना सुद्धा झाले असून येथील लोक खाजगी दवाखान्यात तसेच सरकारी हॉस्पिटल मधून आपला इलाज करून घेत आहेत.या भागात आगरदांडा पार्थमिक आरोग्य केंद असून सदरचे रुग्णालय लांब पडत असल्याने असंख्य लोकांनी आपला इलाज खाजगी रुग्णालयात करीत आहेत. या साथीच्या रोगामुळे लोक खूप भयभीत झाले असून आरोग्य खात्याने चांगली उपाययोजना उपलब्ध करून द्यावी अशी मागणी येथील स्थानिक लोकांनी केली आहे.

 डोंगरी गावात 50 हुन जास्त रुग्ण आढळून आले असून येथील लोक खाजगी रुग्णालयात इलाज करून घेत आहेत.आमच्या प्रतिनिधीने डोंगरी गावात प्रत्यक्ष भेट दिली असता डोंगरी गावाचे अध्यक्ष मछिंद्र नाईक यांनी सांगितले कि, आंबोली धरणातून येणारे पाणी गढूळ व वास येणारे येत आहे.यासाठी आम्ही आमच्या गावातील पाण्याची टाकी स्वछ धून घेतली आहे.व तातडीने आंबोली धरणातील पाणी बंद करण्यात आले आहे.आमच्या गावात 50 पेक्षा जास्त रुग्ण असून ते खाजगी दवाखान्यात इलाज घेत आहेत.गावाला चिचघर धरणातून पाणी देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

 ग्रामस्थ मंगेश पुलेकर यांनी आम्ही ग्रामपंचायतीला सदरच्या पाण्याचे नमुने दिले असताना त्यांनी हे पाणी तपासणीसाठी पाठवले नाही. जर पाण्याची तपासणी झाली असती तर हि साथ पसरली नसती. 

 मुरुड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी संजय चव्हाण यांनी प्रत्यक्ष डोंगरी गावात भेट देऊन तेथील पाण्याची टाकी तपासणी केली.त्याचप्रमाणे ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांना आवश्यक वाटणार्‍या गोष्ट याची पूर्तता होण्यासाठी सर्व डॉक्टर याना आदेश दिले आहेत. त्याचे प्रमाणे गटविकास अधिकारी चव्हाण यांनी सर्व ग्रामपंचायतीना खबरदारीचा उपाय म्हणून पाणी उकळून व गाळून पिण्याचे पत्रच काढले आहे .त्याचप्रमाणे टीसीएल पावडर याचा उपयोग करण्याचे सांगण्यात आले आहे

 

  

अवश्य वाचा