पेण 

पेण तालुक्यातील डोलवी येथील जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेटी लेबर कॉलनीत दोन गटात हाणामारी होऊन त्यामध्ये एका गटातील 2 व दुसर्‍या गटातील 1 असे एकूण 3 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात परस्पराविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी एका गटातील 5 व दुसर्‍या गटातील 8 अशा दोन्ही गटातील एकूण 13 जणांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. 

शुक्रवारी दुपारी 12:30 च्या सुमारास जेएसडब्ल्यू कंपनीच्या जेटी लेबर कॉलनीत बोरीफाटा येथील एकास डोलवी येथील 5 आरोपी मारहाण करीत असताना त्यांना तिघेजण सोडविण्यासाठी गेले असता आरोपींनी शिवीगाळी करून हाताबुक्क्यांनी मारहाण केली व ठार मारण्याची धमकी दिली. तसेच जातीवाचक बोलून आरोपींनी दुसर्‍या इसमास हेल्मेट व लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन जाधव करीत आहेत. 

 तर या प्रकरणी दुसर्‍या गटाने देखील फिर्याद दाखल केली आहे. डोलवी येथील 8 आरोपींनी जेएसडब्ल्यू कंपनी कडुन जेटी लेबर कॉलनी येथील हाउस किपींगच काम मिळाले या गोष्टीचा मनात राग धरून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळी दमदाटी करून लाकडी दांडक्याने व हाताबुक्याने मारहाण करून जखमी केले व साक्षीदार नं.03 यांचे गळयातील चार तोळे व फिर्यादी यांचे गळयातील अंदाजे पाच तोळे वजनाची सोन्याची चैन जबरदस्तीने काढुन घेवून चोरून नेली. तसेच अरोपीने फिर्यादी व साक्षीदार यांना अ‍ॅट्रोसीटीच्या गुन्हयात अडकवितो अशी धमकी दिली.अशी फिर्याद दाखल केली आहे. याप्रकरणी  वडखळ पोलीस ठाण्यात 8 आरोपींविरोधात  गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निऱिक्षक शिंदे हे करीत आहे. 

 

अवश्य वाचा