चिपळूण

इंदिरा काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते लियाकत शाह यांची चिपळूण काँग्रेस शहराध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र रविवार, दि. 12 जानेवारी रोजी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजयराव भोसले यांनी दिले. लियाकत शाह इंदिरा काँग्रेसच्या माध्यमातून राजकारणात सक्रिय झाले ते अद्याप निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. 

2011 साली नगरपरिषदेवर पोटनिवडणुकीच्या माध्यमातून निवडून गेले. त्यानंतर 2014 साली पुन्हा नगरसेवक आणि उपनगराध्यक्ष होण्याची किमया त्यांनी केली होती. तसेच 2019 साली झालेल्या चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीत इंदिरा काँग्रेसचे चार नगरसेवक निवडून आणण्याची मोलाची कामगिरीदेखील त्यांनी केली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी अनेकदा पक्षाच्या हितासाठी अनेकांशी संघर्षदेखील केला आहे.

त्यांच्या या निवडीबद्दल काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्याकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. या निवडीबाबत बोलताना ते म्हणाले, की पक्षाने आपल्यावर टाकलेली जबाबदारी आपण सार्थपणे पार पाडू. काँग्रेसला ऊर्जितावस्था आणण्याचे कामदेखील शहराध्यक्ष पदाच्या माध्यमातून आपण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.तसेच शहराची नूतन कार्यकारिणीदेखील काहीच दिवसांत तयार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

अवश्य वाचा