मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी तुलना केल्याने भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले संतापले आहेत. पक्षातील अतिउत्साही कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांना आवर घाला, अशी विनंती शिवेंद्रराजे यांनी पक्षश्रेष्ठींना केली आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी कुणाचीही तुलना कधीच होऊ शकत नाही. पण पक्षात काही अतिउत्साही कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकारी असतात. त्यांच्या वक्तव्यामुळे पक्ष नेतृत्त्वावर चिखलफेक केली जाते. त्यामुळे अशा अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालण्याची गरज आहेफ,असं शिवेंद्रराजे म्हणाले. 

अवश्य वाचा