मुंबई 

मुंबईचं हृदयस्थान असं ज्याचं वर्णन केलं जातं, त्या गिरगाव परिसराची महती आणि माहिती सांगणारे आपलं गिरगावफ हे कॅलेंडर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले.

या कॅलेंडरची संकल्पना, माहिती संकलन आणि संपादन मुंबईचे ज्येष्ठ अभ्यासक-लेखक अरुण पुराणिक, ज्येष्ठ सिने लेखक-विश्‍लेषक दिलीप ठाकूर आणि एबीपी माझा वृत्तवाहिनीचे न्यूजअँकर अश्‍विन बापट या तीन गिरगावकरांनी केले आहे. शिवसेना दक्षिण मुंबई विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांचे सहकार्य कॅलेंडरच्या निर्मितीसाठी लाभले आहे. कॅलेंडरचं डिझायनिंग आणि प्रिंटिंग निल क्रिएशनचे बाळा अहिरेकर यांनी केले आहे.

कॅलेंडरमध्ये गिरगाव संकल्पनेभोवती साहित्य, राजकीय, खाद्यसंस्कृती, कला आदी 12 विषयांवर आधारित लेख आणि गिरगावची ओळख असलेली ठिकाणं, इमारतींची दुर्मीळ छायाचित्रे आहेत. तसंच गिरगावात वास्तव्यास असलेल्या किंवा गिरगावने ज्यांना घडवलं अशा विविध क्षेत्रातील 14 नामवंतांनी गिरगावबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्यात. यात लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण, ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव, ज्येष्ठ अभिनेत्री सीमा देव, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ आदींचा समावेश आहे.या प्रकाशन सोहळ्याला शिवसेना खासदार अनिल देसाई, शिवसेना नेते रवींद्र मिर्लेकर, मीनाताई कांबळी, युवा सेनेचे प्रथमेश सकपाळ आदी उपस्थित होते.

 

अवश्य वाचा

मुंबई : डे अँड नाईट