मुंबई

ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्यात भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. ऑस्ट्रेलियन कर्णधार फिंचने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा अवघ्या 10 धावा काढून माघारी परतला. यानंतर कर्णधार विराट कोहलीने स्वतः तिसर्‍या क्रमांकावर येण्याऐवजी लोकेश राहुलला बढती दिली. राहुल आणि धवन जोडीने दुसर्‍या विकेटसाठी 121 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. धवन माघारी परतल्यनंतर, विराट कोहली चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात उतरला.

मात्र पहिल्या सामन्यात विराट आपली फारशी चमक दाखवू शकला नाही. फिरकीपटू झॅम्पाच्या गोलंदाजीवर विराट 16 धावा काढून झेलबाद झाला. वन-डे क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकाची जागा ही विराटसाठी फारशी लाभदायक ठरत नाहीये. गेल्या सात सामन्यांमधील आकडेवारी पाहिली की याचा अंदाज येईल. 

दरम्यान, रोहित शर्मा आणि शिखर धवन जोडी भारताला भक्कम सुरुवात करुन देण्यात अपयशी ठरली असली तरीही या जोडीने एक विक्रम आपल्या नावे जमा केला. एखाद्या संघाविरोधात सर्वाधिक धावा करणार्‍या सलामीवीरांच्या जोडीत रोहित-शिखर धवन ही जोडी दुसर्‍या स्थानी पोहचली आहे. दरम्यान, 2020 वर्षात ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणारी वन-डे सामन्यांची मालिका ही भारतीय संघासमोरचं पहिलं मोठं आव्हान असणार आहे. यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौर्‍यावर रवाना होईल. त्यामुळे भारतीय संघ आता कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

अवश्य वाचा

मुंबई : डे अँड नाईट