अलिबाग 

जुनिअर राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेस  मंगळवारपासून (दि. 14) प्ररंभ झाला. राज्यातील 270 कॅरम खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

 रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या मान्यतेने  अलिबाग येथील क्रीडाभवन येथे ही  55 व्या सब - ज्युनिअर व ज्युनिअर राज्य अजिंक्य पद कॅरम स्पर्धा  आयोजन  करण्यात आली आहे.

आज मोठ्या उत्साहात या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी  महाराष्ट्र कॅरम असोसिसशनचे उपाध्यक्ष  अरूण केदार, रायगड जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष  व महाराष्ट्र कॅरम असोसिसशनचे उपाध्यक्ष गिरीश तुळपुळे, छत्रपति पुरस्कार विजेते नथ्ाूराम पाटील,महाराष्ट्र कॅरम असोसिसशनचे सेक्रेटरी यतीन ठाकूर  ,  भाजपाचे  अलिबाग - मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, कमळ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सतीश पाटील, नंदकुमार चाळके,  स्पर्धेचे पंचप्रमुख परवींदरसिंग , सहपंचप्रमुख योगशे फणसाळकर, सुहस कारभारी, रायगड जिल्हा कॅरम असोसिएशचे कार्यवाह  दीपक साळवी आदी यावेळी उपस्थित होते.

अवश्य वाचा