नांदगाव 

फणसगाव येथे पिसाळलेल्या रानटी कोल्ह्याने भरवस्तीत घुसून नागरिकांवर हल्ला केला. या कोल्ह्याने चार जणांचा चावा घेतल्याने ते गंभीर जखमी झाले. सोमवारी सकाळी 8.30 वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला. यामुळे फणसगाव परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वन विभागाने याबाबत तात्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी केली जात आहे. 

सोमवारी सकाळी फणसगाव-पाटीलवाडी, पालकरवाडी, गावठणवाडीतील नागरिक नेहमीप्रमाणे दैनंदिन कामकाजात व्यग्र होते. दरम्यान, लगतच्या जंगलातून एक कोल्हा भरवस्तीत धावत आला. कोल्ह्याने त्याच्या वाटेत सापडलेल्या चार जणांवर हल्ला चढवला. कोल्ह्याचा चावा एवढा जबरदस्त होता, की चौघेही रक्तबंबाळ झाले. श्रीमती विजया विजय पाटील (48), पांडुरंग पालकर (55), श्रीमती माधवी मंगेश गुरव (45), पांडू गुरव अशी या जखमींची नावे आहेत. कोल्ह्याने अभिषेक गुरव या मुलाचा पाठलाग केला. मात्र, त्याने प्रसंगावधान दाखवत कोल्ह्याला चकवा देत आपला जीव वाचवला.

अवश्य वाचा