दापोली 

ताज्या मासळीसाठी प्रसिद्ध असलेल्या बुरोंडी बंदरामध्ये मासेमारांना मासे विक्रीकरिता मच्छीमार्केटची अजूनही प्रतीक्षाच असल्याची खंत येथील मच्छिमार बांधव बोलून दाखवत आहेत.

बुरोंडी बंदरात सकाळी 8.30 वाजल्यापासून मासळीचा मोठा लिलाव भरतो. मासे खरेदीसाठी आलेल्या खवय्यांसह लिलावात भाग न घेणार्‍या खरेदीदारांना स्थानिक मच्छी विक्रेत्यांकडून मासळी विकत घ्यावी लागते. ही मासळी नेमकी कोठे मिळेल, याची शाश्‍वती नसल्याने यासाठी मासे खरेदीसाठीचे कायमचे ठिकाण असले पाहिजे. मात्र, असे ठिकाण नसल्याने बुरोंडी हे मासेमारी बंदर अजूनही गेल्या अनेक वर्षांपासून येथील मासे विक्रेत्यांना मच्छी मार्केटविना उघड्यावर मासळी विकण्यासाठी बसावे लागत आहे.

अवश्य वाचा