दिनांक 8 फेब्रुवारी 2020

* 1778 - स्वीडिश वनस्पतीशास्त्रज्ञ इलियास मॅग्नास फ्राईल यांचे निधन.

* 1825 - हिंदू धर्माचा त्याग करुन ख्रिस्ती धर्मात गेलेले पहिले महाराष्ट्रीय ब्राह्मण निळकंठशास्त्री शिवरामशास्त्री गोर्ये यांचा जन्म.

* 1897 - माझी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. झाकीर हुसेन यांचा जन्म.

* 1907 - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधवराव गोलवारकर (गुरुजी) यांचा जन्म.

* 1960 - गणपत आदळकर यांची पंजाबच्या खडकसिंघावर मात करुन कुस्तीतील मनाचा हिंदकेसरी पुरस्कार पटकावला. 

भले शेर्न वॉर्नची कसोटी क्रिकेटमधील बळींची संख्या 700 च्या वर झाली, मुरलीधरनने 700 बळी घेण्याची वल्गना केली असेल, अनिल कुंबळे हा भारतातर्फे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज असेल, तरीही सर्वांमध्ये आमचा कपिल हा श्रेष्ठच, याबाबत नो अपिल.

6 जानेवारी 1959 रोजी कपिलचा चंदीगडला जन्म झाला. तथापि, 8 फेब्रुवारी हा दिवस कपिलच्या आयुष्यातला सर्वात महत्त्वाचा. कारण, त्यावेळी अबाधित असलेल्या रिचर्ड हेडलीचा 431 बळींचा विक्रम 8 फेब्रुवारी 1994 रोजी अहमदाबाद येथील कसोटीत श्रीलंकेच्या हसन तिलकरत्लेचा बळी घेऊन कपिलने मोडला. हा त्याच्या आयुष्यातला संस्मरणीय दिन. अलीकडच्या पिढीला कपिलच्या विक्रमाचे विशेष कौतुक वाटणार नाही; परंतु त्याने ज्या प्रतिकूल परिस्थितीत हे यश संपादन केले, ते निश्‍चितच कौतुकासपद आहे.

कपिलचे भारतीय क्रिकेटला फार मोठे योगदान आहे. त्याने भारतीय क्रिकेटला विजयाची सवय लावून दिली. मुख्य म्हणजे, सामना एकहाती फिरविण्याची किमया त्याच्या गोलंदाजीत होती. मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त 143 धावा पाहिजे होत्या. कपिलचा पाय दुखत होता. अशा वेळी वेदनाशामक इंजेक्शन घेऊन कपिल मैदानात उतरला. 18 धावांत 5 महत्त्वाचे बळी घेऊन ऑस्ट्रेलियाला 83 धावांत गुंडाळून कसोटी विजय मिळवून दिला. वर्ल्डकपमधील त्याची ती 175 धावांची झंझावाती खेळी आजही क्रिकेटविश्‍व विसरले नाही. 1983 चा वर्ल्डकप जिंकायला कपिलच कारणीभूत ठरला. त्याची मैदानावरची नुसती उपस्थिती भारतीयांसाठी प्रेरणादायी, तर प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरणारी असे. म्हणूनच 185 मध्ये भारताच्या फक्त 115 धावा झाल्या होत्या, तरीही पाकिस्तानला केवळ 84 धावांत गुंडाळून विजय मिळवला. याला कारण केवळ कपिलची मैदानावरची उपस्थिती.

100 बळी व 1000 धावा असे दुहेरी यश साधून त्याने आपले अष्टपैलूत सिद्ध केले. आपल्या 16 वर्षांच्या कारकीर्दीत 131 कसोटी सामन्यांत 434 बळी व 5244 धावा करणारा कपिल हा जगातील एकमेव. अल्पावधीतच त्याने एकदिवसीय सामन्यांतही चांगले जुळवून घेतले. येथेही 225 सामन्यांत 253 बळी आणि 3,783 धावा केल्या.

क्रिकेटमधील त्याच्या या बहुमोल कामगिरीमुकळेच हरण्याची या हरिकेणने ‘विस्डेन क्रिकेटर ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळवला. कपिल म्हणजे भारतीय क्रि केटच्या  वेगवान गोलंदाजीला पडलेले स्वप्न. भारतात वेगवान गोलंदाज निर्माण होऊ शकतात, हे कपिलदेवने दाखवून दिले. वेगवान गोलंदाजांना पोषक नसणान्या निर्जीव झालेल्या पाटा खेळपट्टीवर ज्या केवळ फलंदाजीला पोषक असतात, त्यातच भारताचे हवामान इंग्लंडसारखे गाव पावसाळा नसल्याने चेंडू फ़ारसा स्विंग होत नसतानाही कपिलचे यश जगातल्या कोणत्याही गोलंदाजापेदा  निर्वावाद श्रेष्ठच आहे. 

अवश्य वाचा