दिनांक 10 फेब्रुवारी 2020

* 1728  - टाऊन हॉलमध्ये कपनी सरकारचे मेपर कोर्ट स्थापन. ।

* 1803 - आधुनिक मुंबईचे एक शिल्पकार नाना शंकरशेठ यांचा जन्म ।

* 1840 - स्विडीश रसायनशास्त्रज्ञ पर थिओडर क्लेव्ह यांचा जन्म.

* 1847 - ब्रिटिश रसायनशाखज्ञ चार्लल्स हेंचेट यांचे निधन.

* 1865 - जर्मन पदार्थविज्ञान शास्त्रज्ञ सर हेन्री फ्रेड्रिक एलिम लेझ यांचे निधन.

पुणे शहर विविध वास्तू, आणि वास्तूच्या अलंकाराने नटलेले आहे. त्यात पुणे विद्यापीठ हे पुणे शहराचा मुकुट आहे. पुणे विद्यापीठाचे वैशिष्ट्य म्हणजे या विद्यापीठाला जसा इतिहास आहे तसा त्या वास्तूलाही इतिहास आहे. पुण्याचे ऐतिहासिक आणि राजकीय महत्त्व लक्षात घेऊन इंग्रजांनी पुण्यात गणेशखिंडीच्या  रस्त्यावर 1864 ते 71 च्या सुमारास राजभवन बांधले. हे राजभवन म्हणजे आजचे पुणे विद्यापीठ. तब्बल 1 लाख 71 हजार पौंड खर्चू्न ही टोलेजंग वास्तू सर बर्टल फ्रिलपर यांनी नियोजित केली.

राजभवनाचे रचनाकार टूबशॉँ हैे वास्तू  स्थापत्यकार असून बांधकाम मि. हार्वड यांनी केले. रोमन धर्तीच्या कमानी, गॉथिक स्तंभशीर्ष, इटलीच्या कम्पेनाईलसारखा झेंड्याचा मनोरा अशा अनेक शैलींचा मिलाफ घडवून भारतीय कारागीरांच्या हाताने ही शानदार वास्तू उभी राहिली. ब्रिटिशांना उन्हाळ्याचा त्रास होऊ नये म्हणून प्रशस्त मोकळी जागा, हवेशीर दालने, जमिनीपर्यत पोहोचणार्‍या खिडक्या (हवा येण्यासाठी) यांचा वापर ह्या वास्तूत आहे. याशिवाय झुंबराचा लखलखाट, त्याला दिवा व आरशांची झालर, सोन्याचा वर्खाने मढवलेले पत्रे, ब्रह्मदेशातून आणलेले सागवान लाकूड, परिणामी आजही ही इमारत आणखी हजार वर्षे सहज टिकेल असा विश्‍वास वाटतो. या वास्तूतील शिवाजी सभागृह, दरबार हॉल पाहिल्यावर आजही इंग्रजी अवशेषांच्या खुणा त्यांची साथ देतात. 1948 साली ही वास्तू पुणे विद्यापीठास प्रदान करण्यात आली.

नारायण चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई प्रांतात इ. स. 1917 मध्ये शैक्षणिक परिषद भरली होती. त्या परिषदेत प्रादेशिक विद्यापीठे असाबीत, असा ठराव पास करण्यात आला. तथापि, 1932  पर्यत परिस्थिती ‘जैसे थे’च होती. पुढे मुकुंदराव  जयकर यांनी प्रादेशिक विद्यापीठांचा प्रश्‍न धसास लावला तेव्हा ब्रिटिश शासनाने त्यांच्याच अध्यक्षतेखाली एक समिती नेमून याविषयी अहवाल सादर करण्याची विनंती केली. हा अहवाल 1949 च्या सुमारास स्वीकारला गेला.

आणि...10 फेब्रुवारी 1949, रोजी पुणे  विद्यापीठाची अधिकृतरित्या स्थापना झाली. पहिले कुलगुरु म्हणून मुकुंदराव जयकर यांचीच शासनाची नियुक्ती केली. राजभवन ही पुणे विद्यापीठाच्या वास्तू मुंबई राज्याकइ्न उपलब्ध करुन घेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, तसेच दानशूर लोकांकडून देणग्या मिळवून विद्यापीठांच्या उत्कर्षासाठी त्यांनी बरेच कष्ट घेतले. आज पुणे विद्यापीठाला जो आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला आहे त्याचे सर्व श्रेय मुकुंदराव जयकारांचे.

कुलगुरु हा विद्यापीठाचा गुरु आणि पिता ह्या दोन्ही भूमिका निभावतो. त्याच्या वैयक्तिक करिष्म्यावरच विद्यापीठाचे भवितव्य अवलंवून असते. सुदैवाने विद्यापीठाला दैदिप्यमान अशा कुलगुरुंची परंपरा लाभली. त्यामध्ये रँगलर परांजपे, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार, गाडगीळ, पारसकर, आपटे ताकवले,  वसंत गोवारीकर, नरेंद्र जाधव इ.यांचा समावेश आहे. विद्यापीठाचे संविधान इतर विद्यापीठांप्रमाणेच आहे. विद्यापीठात पुरातत्चविद्या, वृत्तपत्रविद्या  मानवशास्त्र, राज्यशास्त्र, हिंदी, मराठी, इंग्रजी, संस्कृत, प्राकृत, इतिहास, भूगोल, सार्वजनिक  प्रशासन, आधुनिक भाषा, युरोपियन भाषा, वनस्पती रसायन, भूविज्ञानशास्त्र, गणित, वैद्क, अभियांत्रीशिवाय सी-डक, आयुका, नानासाहेब परुळेत पर्यावरण विभाग अशी विशेष अभ्यास संशोधन केंद्रे कार्यरत आहेत. देशातील नव्हे तर जगातील सर्वोत्कृष्ट  ग्रंथालयांमध्ये पुणे विद्यापीठातील जयकर ग्रंथालयाचे नाव आदराने घेतले जाते. मोठ्या प्रमाणात दुर्मिळ ग्रंथ या ग्रंथालयात आहेत. विद्यापीठाच्या परिसरात प्रसन्न वातावरण मोहवून टाकणारे आहे. प्राचीन भारतात नालंदा, तक्षशिला या विद्यापीठांनी एक विशिट उंची गाठून सुसंस्कृत भारताचा वारसा चालविणारी पिढी घडवली होती. तेव्हा हिंदुस्थानाच्या प्राचीन विद्यापीठाचा वारसा पुणे विद्यापीठाने चालवून विद्यापीठांच्या इतिहासात आपले नाव अजरामर करावे हीच अपेक्षा.

               

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार