दिनांक 11 फेब्रुवारी 2020

* 1650 - फ्रेच गणिती, बीज-भूमितीचा जनक रेने देकार्त यांचे निधन.

* 1800 - छायाचित्रकला व निगेटिव्हचा प्रथम वापर करणारे हेत्री फॉक्स तालबॉट यांचा जन्म.

* 1830 - मुंबईत अ‍ॅग्रीहार्टिकल्चरल सोसायटी ऑफ वेस्टर्न डंडिया सोसायटीची स्थापना.

* 1847 - संशोधकाचा मुकूटमणी टॉमस अल्वा एडिसन यांचा जन्म.

* 1850 - मराठी शुद्धलेखनाविषयक चळवळीचे पुरस्कर्ते शंकर हातवळणे यांचा जन्म.

11 फेबुवारी, 1990 जागतिक इतिहासातील एक ऐेतिहासिक सोनेरी दिन उजाडला. तब्बल दहा हजार दिवसांच्या (27 वर्षे) प्रदीर्घ कारावासातून एका महामानवाची मुक्तता होणार होती. सार्‍या जगातील शेकडो फोटोग्राफर्स, पत्रकार, टी.व्ही. प्रतिनिधी आणि लक्षावधी नागरिकांनी त्यांच्या स्वागतासाठी सकाळपासून गर्दी केली होती आणि दुपारी तीनच्या सुमारास वर्णद्वेषाच्या त्या गोर्‍या बेड्यात अडकवलेले ते हातपाय आकाशात स्वच्छंदपणे उडायला मुक्त झाले. अनेक वर्षे अंधारकोठडीत असणार्‍या त्या माणसाचे डोळे या स्वागताने भरुन आले. आसमंत त्यांच्या नावाचा जयजयकार करत होता आणि ती व्यक्ती नम्रपणे सांगत होती की, मी तुमचा प्रेषित नाही, सेवक आहे. तो सेवक होता दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्रीय पुरुष, सार्‍या जगाने महामानव म्हणून गौरवलेला ‘नेल्सन मंडेला’.

नेल्सन मंडेलांचे सारे जीवनचरित्र अद्भुत अशा नाट्यमय घटनांनी घडले असल्यामुळे ती एक दंत कथा बनली आहे. 18 जुलै 1918 रोजी ट्न्सकेईची राजधानी उमटाटा येथील ‘वेझो’ नावाच्या खेड्यात नेल्सनचा जन्म झाला. त्यांचे वडील त्यांच्या टोळीचे प्रमुख होते. गोर्‍यांनी आपल्या देशात घुसून आपल्याला कसे गुलाम केले याची जाणीव बालवयातच त्यांना झाली. प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यावर महाविद्यालयीन शिक्षण ब्ल्यू फोर्टमध्ये पूर्ण केले. पुढे वकिलीचा अभ्यासही त्यांनी पूर्ण केला. भूतलावरील नैसर्गिक साधन संपत्तीचा स्वर्ग ही देणगी वरदान न ठरता द. आफ्रिकेला शाप ठरली. कारण, तो लुटायला प्रथम पोर्तुगीज आणि मग डच, फ्रेंच, जर्मन आणि शेवटी ब्रिटिशही उतरले. गोर्‍यांनी हा स्वर्ग लुटला. काळ्यांनी नरकात ढकलून निग्रोंच्या जमिनी गोर्‍यांनी लघुपणाने बळकावल्या. त्यांच्याच जमिनीवर त्यांच्याकडून गुराढोरांना लाजवेल असे काम गोर्‍यांनी केले. निग्रोंना मारणे हा गोर्‍या शिपायांचा शूरपणा, तर निग्रो स्त्रीवर अत्याचार करणे हा आपला अधिकार, असे गोर्‍यांना वाटे. आणि, आणखी एक वाईट गोष्ट म्हणजे, निग्रोंना सतत आपले ओळखपत्र त्यांच्या गुलामगिरीचे प्रतीक म्हणून बाळगायला लागत असे. याच्याच विरोधात गांधीजींनी 20 व्या शतकाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत लढा देऊन स्वातंत्र्याच्या प्राथमिक शिक्षणाचे धडे दिले होते. त्याच महात्मा गांधींजींच्या तत्त्वाज्ञानाने आपण आपल्या हक्काचा लढा लढायचा असा ठाम निर्णय नेल्सनने घेतला. आफ्रिका नॅशनल काँग्रेसच्या यूथ विंग विभागाचे ते अध्यक्ष झाले.

1952 साली त्यांनी म. गांधीजींच्या धर्तीवर कायदेभंगाची चळवळ सुरू केली. जुलमी कायदे न पाळण्याचे आव्हान त्यांनी केले. तेव्हा त्यांना पकडण्यात येऊन कम्युनिस्ट असल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला. तीन महिन्यांची सश्रम कारावासाची शिक्षा त्यांना गोर्‍यांनी ठोठावली. तेव्हा स्वातंत्र्ययोद्धा म्हणून त्यांचा जन्म झाला. यानंतरचा त्यांचा प्रवाह तुरुंग, अन्याय आणि हालअपेष्टांनी भरलेला आहे. याकामी त्यांच्या पत्नी विनी मंडेलांनी त्यांना मोलाची साथ दिली. पती कायम तुरुंगात असतानाही मुलांचे पालनपोषण त्या स्वतः काबाडकष्ट करून करत. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसचीही धुरा त्या सांभाळत होत्या. दिवसेंदिवस मंडेलांच्या नेतृत्वाखाली आफ्रिकन समाज जागा होत चालला होता. तेव्हा या नेल्सननाच कायमस्वरुपी संपविण्याचा विचार गोर्‍या ब्रिटिशांच्या मनात आला. त्यांच्या अनेक सहकार्‍यांना यापूर्वीच फाशी दिली होती. तेव्हा यालाही अशीच फाशी दिली तर? सन 1962 च्या पॅन आफ्रिकन परिषदेत बंदीहुकूम असताना ते हजर राहिले म्हणून अटक करुन प्रिटोरियाच्या तुरुंगात त्यांची रवानगी करून पुढे रॉबेन आयलंड या एकाकी बेटावर पाठवले आणि रिव्होनिया ट्रायल या नावाने इतिहासातील सर्वात मोटा खटला त्यांच्यावर सुरु झाला. त्यांचा खटला ते स्वत:च लढले. त्यावेळेस त्यांनी केलेले निवेदन हे इतिहासाने सोनेरी अक्षरात लिहिले. मंडेला म्हणाले, “जेव्हा सारा देशच तुरुंगात होतो, तेव्हा माझ्याऐवजी हे सरकारच आरोपीच्या पिंजर्‍यात उभे हवे होते. मी मुळीच अपराधी नाही. मी कम्युनिस्ट नाही. मी गोर्‍यांच्या वर्चस्वाविरुद्ध लढतोच, तसेच काळ्यांच्याही मी त्या आदर्श लोकशाहीची स्वप्ने पाहतोय, जिथे मानव समान असतील, याच ध्येयासाठी मी जगतोय, झगडतोय. त्यासाठी हा देह ठेवायची तयारी आहे.’ चार तासांचे त्यांचे हे निवेदन त्यांनी संपवले आणि ते निकालाची वाट पाहू लागले. 12 जून, 1164  रोजी न्यायाधीश जे. वेट यांनी निकाल दिला की, ‘मला निग्रोंच्या व्यथा जाणवत आहेत. आरोपीचे कृत्य लोकल्याणासाठी असले तरीही समाजातील कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित करणे हे कोर्टाचे काम आहे. आणि, या आरोपीचा गुन्हा गंभीर आहे, तो म्हणजे राजद्रोहाचा. कर्तव्याला धरुन दया दाखवून मी त्यांना शिक्षा फर्मावत आहे. ती शिक्षा म्हणजे आजन्म कारावास. त्या वेळेस मंडेला 46 वर्षांचे होते. वयाच्या 73 व्या वर्षी ते सुटले. दक्षिण आफ्रिकेच्या वर्णद्वेषी सरकारचे अखेरचे अध्यक्ष पीटर बोथा यांना पराभूत करून त्यांनी 10 मे 1994 रोजी द. आफ्रिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. त्यांना वाव देण्यासाठी पुढे लवकरच त्यांनी राजसंन्यास घेतला आणि उर्वरित आयुष्य अगदी साधेपणाने जगत आहेत. आपल्या भारतीय राजकारण्यांनी त्यांचा शेवटचाच (राजसंन्यास) आदर्श घेतला तरी या देशाचे भले होईल. आणखी एक महत्त्वाचे म्हणजे, ते सध्या एड्स जनजागृतीचे कार्य करतात. हे कार्य करत असताना आपली मुले एड्सने दगावली, हे जाहीरपणे भरसभेत सांगतात. मानवतेच्या भल्यासाठी या महामानवास उदंड आयुष्य लाभो.

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार