दिनांक 12 फेब्रुवारी 2020

* 1665 - जर्मन वनस्पतीशास्त्रज्ञ रुकॉल्फ जॅकोब कॅमरॅरीयास यांचा जन्म.

* 1794 - उत्तर भारतात पुन्हा मराठी सत्तेचा दबदबा निर्माण करणारे महासेनापती महादजी शिंदे यांचे निधन.

* 1809 - ब्रिटिश वैज्ञानिक चार्ल्स डार्विन चांचा जन्म.

* 1882 - बंगाली कवी सत्येंद्रनाथ यांचा जन्म.

* 1906 - भालाकार भोपटकरांना ‘नरकाचा दरबार’ हा ब्रिटिश सरकारविरोधात छापलेल्या लेखाबदल सहा महिने कैद.

आज 21 व्या शतकात भारतातील स्त्रिया आता कोठे पुरुषांशी बरोबरी करू लागल्या आहेत. तरीही रेल्वे, वैमानिक इ. विविध क्षेत्रात एखाद्या महिलेने चमकतर कामगिरी केली की, आजही त्याला प्रसिद्धी दिली जाते. शरमेची गोष्ट म्हणजे, आता कुठे काही क्षेत्रात स्त्रियांना प्रवेश दिला जातोय. उदा. द्यायचे झाले तर रिक्षा, बस, रेल्वे चालवणे. आज ही स्थिती तर 150 वर्षांपूर्वी काय असेल? आज 10 वी, 12 वीची गुणवत्ता यादी पाहिली, की त्यात मुलींचा प्रभाव जाणवतो, ही आनंदाची गोष्ट आहे. मुलींसाठी खास वेगळे सत्कार समारंभ आयोजित करणार्‍या विविध नामवंत संघटना आता आहेत आणि मुली त्या समारंभाला आवर्जून जातात. त्यामुळे त्याचे आता नावीन्य वाटत नाही. पण, या मुलींचा परीक्षेत पास झाल्याबद्दलचा 12 फेबुवारी, 1853 रोजी पहिला सत्कार समारंभ पुण्यात पार पडला. कसा पार पडला हा सत्कार समारंभ?

सन 1851, पहिली मुलींची शाळा पुण्यात महात्मा फुले यांनी सुरू केली. सर फरस्किन पेरी यांच्या प्रेरणेत 1852 पर्यंत 50 मुली शिक्षण घेत होत्या व या सर्व मुली परीक्षेत यशस्वी झाल्या होत्या. तेव्हाच या मुलींचा तो ऐतिहासिक पहिला कौतुक व बक्षीस समारंभाचा सोहळा 12 फेबुवारी, 1853 रोजी सायंकाळी 4 वाजता पुना कॉलेजच्या चौकात पार पडला. या भव्यदिव्य समारंभाला तीन हजारांचा जनसमुदाय मोठ्या कुतूहलाने उपस्थित होता. चौकात निमंत्रितांसाठी सोफे, गालीचे, खुर्च्या इ. व्यवस्था केली होती. निमंत्रित युरोपियनात ब्रिगेडिअर हायड्रेल कॉकबर्न, मेजर कॅण्डी, डॉ. जिलेण्डर, केंप्टन विलिंगबी, प्रो. प्रेसर इ. मान्यवर, तर हिंदुस्थानी निमंत्रितांच्या यादीत सरदार आप्पासाहेब ढमढेरे, आबासाहेब मुझुमदार, सरदार पटवर्धन, सरदार बीनीवाले, सरदार मेहेंदळे, सरदार खाजगीवाले, सरदार तुळशीबागवाले इ. मान्यवर उपस्थित होते.

हा कौतुक सोहळा होता तशीच मुलींची परीक्षाही या सोहळ्यात होणार होती. या सर्व समुदायासमोर गेले दोन वर्षे शिकणार्‍या मुलींना परीक्षा द्यायची होती.

कार्यक्रमाची सुरुवात स्त्री शिक्षणाचे प्रचारक बापूरावजी मांडे यांनी अहवाल वाचनाने केली. अहवालात बालविवाहाची अमानुष प्रथा बंद करावी असे नमूद केले होते, कारण बालविवाहामुळे मुलींच्या संख्येत घट होते. अहवाल वाचनानंतर श्रीमंत साहूकर आप्पासाहेब चिपळूणकर यांनी भाषण केले. ते म्हणाले, ‘स्त्रियांना विद्या शिकवून त्यांची सुधारणा करणे, त्यांस त्यांच्या योग्यतेप्रमाणे मान देणे व त्यांच्या कल्याणाची काळजी बाळगणे, हे हिंदू, लोकांच्या विचाराविरूद्ध वाटेल. इतकेच नाही तर असे केले असता त्यांच्या मते, स्त्रियांनी कोणत्याही पुरुषांशी बरोबरी करू नये, परंतु असा वृथा अभिमान बाळगल्याने आपल्या देशाची अवस्था धुळीला मिळाली आहे, ती त्यांच्या लक्षात येत नाही.’

या भाषणानंतर पहिली ते चौथीच्या मुलींच्या परीक्षा घेण्यात आल्या. तेव्हा मुलींनी आपले वाचनाचे कौशल्य तसेच भूगोल, अंकगणित, मराठ्यांचा इतिहास इ. विषयांच्या ज्ञानाची चुणूक दाखवली. त्यात काही मुलींनी इंग्रजी भाषासुद्धा चांगल्या रीतीने आत्मसात केली होती. एका मुलीने अंकगणिते इंग्रजीत सोडवून दाखवली. अशा परीक्षेनंतर तो भारतातील पहिला कौतुक सोहळा व बक्षीस समारंभाचा कार्यक्रम सुरू झाला. श्रीमती जोन्स यांच्या हस्ते सर्व उत्तीर्ण मुलींना साडी व पुस्तके देण्यात आली. हा समारंभ सुरू असताना जेव्हा एका मुलीला सांगण्यात आले की, ‘तुला बक्षीस मिळणार आहे, तेव्हा तिने उठून भर सभेत सांगितले, की, ऊेप’ीं सर्ळींश र्ीी िीळूशी, सर्ळींश र्ीी र ीलहेेश्र श्रळलीरीू’ खूप उशिरापर्यंत हा कार्यक्रम चालू होता. या कार्यक्रमाच्या शेवटी प्रोफेसर प्रेसर यांचे भाषण झाले. ते म्हणाले, “बंधू आणि भगिनींनो, मला असे सांगावेसे वाटते की, या खाणीमध्ये इतके मौल्यवान हिरे आहेत, की ते क्वचितच बाहेर आणले गेले होते. तुम्ही या दुपारी जे धैर्य, साहस देण्याच्या कामात सहभागी झालात, त्यापेक्षा दुसरे कोणतेही आदर्श व साहसी काम असू शकत नाही, की जे समाजाला व राष्ट्राला अधिक फायदेशीर आहे.          

 

 

अवश्य वाचा