मुरुड जंजिरा  

कोकणाला 720 किलोमीटरचा समुद्र किनारा लाभला असून कोकण हे एक पर्यटन स्थळ आहे. येथे पर्यटकांचा ओघ वाढलेला असून रस्त्यासारखी उत्तम सेवा उपलब्ध करून दिल्यास पर्यटकांच्या संख्येत वृद्धी होणार आहे. जर मुंबई -पुणे एक्सप्रेसवे बनू शकतो मग रेवस रेड्डी महा मार्ग बनलाच पाहिजे अशी आग्रही भूमिका मी अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे घेतल्यामुळे त्यांनी एमएसआरडीसीकडून डीपीआर मंजूर करून घेतला आहे. राज्य शासनाकडून या रस्त्याला मंजुरी मिळणार असल्याची ग्वाही खा. सुनील तटकरे यांनी दिली.

या रस्त्यासाठी किमान तीन हजार पाचशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून सन 2020 लाच या रस्त्याच्या कामाच्या भूमिपुजन होईल असा विश्‍वास रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केले आहे. मुरुड येथील माळी समाज हॉलमध्ये सभापती अशीका अनंत ठाकूर यांच्या सत्काराला ते मुरुड येथे आले असताना ते आपल्या भाषणात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मंगेश दांडेकर, अतिक खतीब, माजी जिल्हा परिषद सदस्य सुबोध महाडिक, अ‍ॅड. इस्माईल घोले, सभापती अशीका ठाकूर, नेहा पाके, फैरोझ घलटे, सचिव विजय पैर, स्मिता खेडेकर, संजय गुंजाळ, अविनाश दांडेकर, मुश्ताक हसवारे, माजी नगरसेविका प्रमिला माळी, अनंत ठाकूर आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक मंगेश दांडेकर यांनी केले. अतिक खतीब यांनी पर्यटन व्यवसायासाठी मुलभुत बाबींची पुर्तता करण्याची थेट मागणी केली. यावेळी वांद्रे पंचक्रोशी धरणाचा प्रश्‍नही फैरोज घल्टे यांनी उपस्थित केला. 

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार