दिनांक 13 फेब्रुवारी 2020

* 1743 - ब्रिटिश निसर्ग शाखज्ञ सेंट जोसेफ बार्ट ब्याकर्स यांचा जन्म.

* 1756 - तुळाजी आंग्रे यांचा पराभव करुन इंग्रजांनी विजयदुर्ग जिंकला.

* 1834 - जर्मन निसर्गशास्त्र अन्सर्ट हेनरिक हॅकेस यांचा जन्म.

* 1871 - भारतीय नाइटिंगेल अर्थात कवयित्री सरोजिनी नायडू यांचा जन्म.

* 1814 - पूना मर्कटाईल बँकेची स्थापना.  

‘माझ्यासाठी शब्द देण्याचा  तुला अधिकार काय? असे नामदार गोखल्यांनी जया कठोरपणे विचारताच ’ अधिकार आहे. ‘हक्काचा.... तरुण पिढीला आदेश संदेश देण्यासाठी काहीही करून तुमचे नेतृत्व मागण्याचा.’ तिच्या ह्या बोलण्याने खुद्द नामदार गोखले निरुत्तर झाले आणि जीनांच्या हिंदू-मुस्लिम ऐक्याच्या लंडन येथील कार्यक्रमाला उपस्थित राहिले. ती म्हणजे ‘नाईटिंजेल ऑफ इंडियन सॉग’ या बिरदावलीने जगाला परिचित असणारी कवयित्री सरोजिनी नायडू. 13 फेबु्रवारी, 1879 रोजी हैदराबाद येेथे सरोजिनीचा अधोरनाथ चटोपाध्याय यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. वडील निजाम कॉलेजात प्राचार्य, वयाच्या 12 व्या वर्षीच सरोजिनीनी  मॅट्रिक परीक्षेत मद्रास इलाक्यात सर्वप्रथम येऊन आपल्या बुद्धीची चुणूक दाखवली होती. वयाच्या 13 व्या वर्षीच 1300 ओळींचे इंग्रजीतून महाकाव्य  लिहिले. या बालबुद्धीची दखल खुद्द निजामाला घ्यावी लागली. त्याने प्राचार्य अधोरनाथांच्या मुलीला इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती दिली. केंब्रिज येथील गर्टन कॉलेजात त्यांनी प्रवेश घेतला. पण प्रकृती साथ देईना तेव्हा अर्ध्यावर शिक्षण सोडून तीन वर्षांनी त्यांनी भारताची वाट धरली पण या काळात इंग्लंडमध्ये इंग्रजी साहित्याच्या समुद्रात त्या मनसोक्त डुंबल्या. तेथे त्यांच्या कविता अधिक फुलल्या. भारतात परतल्यावर त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील इतिहासातील एक धाडसी निर्णय घेतला, तो म्हणजे डॉ. नायडू यांच्याशी विवाह करण्याचा. घरच्यांचा विरोध असूनही त्यांनी आपला हा आंतरजातीय विवाह धर्माची अडचण नको म्हणून ब्राह्यो पद्धतीने केला.

तत्कालीन भारतातील सर्व थोरामोठ्यांचा सहवास सरोजिनीना मिळाला. गोखले, टिळकांचा सहवास सरोजिनींना मिळाला गोखले, टिळकांचा  त्यांना अल्पकाळ  लाभला. राष्ट्रवादी जीना त्यांना भेटले होते. अ‍ॅनी बेझंट त्यांना मैत्रीण म्हणून मिळाली. नेहरुंच्या रूपाने भाऊ मिळाला. योगी अरविंदबाबूंचे त्यांना आशीर्वाद लाभले. तथापि गांधीजी त्यांना भेटले आणि जीवनाचा दुसरा अंक सुरू झाला तो आपल्या कविता वास्तवात उतरविण्याचा. टिळकांच्या मृत्यूनंतर त्या गांधीवादी बनल्या. राजकारणासाठी हैदराबाद सोडले आणि मुंबईत आल्या. प्रांतिक काँग्रेसचे अध्यक्षपद ते 1924-25 साली कानपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षा असा राजकीय प्रवास जीवनात झाला.

1130 साली सविनय कायदेभंगाच्या चळवळीत असताना येथील मिठाचा सत्याग्रह त्यांच्या नेतृत्वामुळे गाजला. त्या वेळी त्यांनी केलेल्या काव्यमय भाषणाने श्रोते मंत्रमुग्ध होऊन गेले. त्या म्हणाल्या, ‘गांधीजींचे शरीर तुरुंगात आहे पण आत्मा तुमच्या-आमच्याबरोबर आहे. कोणत्याही परिस्थितीत हिंसा करता काम नये.’ त्यांच्या नेतृत्वाची तेव्हा अमेरिकेनेही दखल घेतली. 1942 च्या चळचळीत त्यांनी लिहिलेल्या कवितेचे कारागृहांच्या भिंतीत आणि सभागृहांच्या मंडपात वाचन होत असे. 1947 च्या आशियाई राष्ट्राच्या परिषदेत त्यांनी अध्यक्षस्थान भुषविले.

आणि.... आणि.....त्यांच्या स्वप्नांचा चुरडा झाला, अखेर बॅ. जीना यांनी पाकिस्तान मिळवले तेव्हा त्या खचल्या, पण बापूजींच्या काठीच्या आधारावर त्या घालत होत्या. त्यांची राज्यपाल म्हणून बंगालगध्ये नियुक्ती झाल्यावर नेहरुंना त्या म्हणाल्या, तुम्ही जंगलातला एक पक्षी पिंजर्‍यात कोढून ठेवत आहात, स्वतंत्र भारताच्या त्या  पहिल्या स्री राज्यपाल. त्यांनी अनेक मानाची पदे उपभोगली 1908 मध्ये भरलेल्या विधवा विवाह परिषदेत त्यांनी स्त्री-स्वातंत्र्याचा  पुरस्कार केला, 1929 मध्ये मोबांसा येथे भरलेल्या ईस्ट आफ्रिकन इंडियन काँग्रेसच्या त्या अध्यक्षा होत्या. भारतीय स्वातंत्र्याचे विचार रुजविण्यासाठी त्यांनी अमेरिकेचाही दौरा केला होता. दुसर्‍या गोलमेज परिषदेत त्या गांधीजींसोबत गेल्या होत्या.

गांधी माझे कनैह्या आहेत. मी त्यांची बासरी आहे असे त्यास्वतःबद्दल म्हणत म. गांधींच्या निधनानंतर त्या खचल्या आणि 2 मार्च 1949 रोजी सरोजिनीबाईचेही निधन झाले.

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार