नवी दिल्ली/वॉशिंग्टन 

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 24 फेब्रुवारीपासून दोन दिवसीय भारत दौर्‍यावर येणार आहेत. ते दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार असल्याचे मंगळवारी जाहीर करण्यात आले.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यामुळे द्विपक्षीय संबंध आणखी दृढ होतील, असा विश्‍वास भारत आणि अमेरिकेने व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून ट्रम्प भारतभेटीवर येत असल्याचे भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मोदी आणि ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून संभाषण झाल्यानंतर ट्रम्प यांच्या भारत दौर्‍याची घोषणा करण्यात आली.

या दौर्‍यात ट्रम्प हे दिल्ली आणि अहमदाबादला भेट देऊन तेथील अधिकृत कार्यक्रमांत सहभागी होणार असून, विविध क्षेत्रांतील व्यक्तींशी संवाद साधणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. ट्रम्प यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मेलेनिया याही भारत दौर्‍यावर येणार असल्याचे व्हाइट हाऊसच्या माध्यम सचिव स्टेफनी ग्रीशम यांनी सांगितले.

 

 

 

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार