माणगाव 

माणगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणार्‍या सुरव तर्फे तळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी शेतकरी कामगार पक्षाच्या सरिता बळीराम खडतर यांची बिनविरोध निवड झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

सुरवतर्फे तळे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच संजय जाधव यांनी आपला उपसरपंचपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने राजीनामा दिला होता.या रिक्त झालेल्या उपसरपंच पदाची निवडणूक दि.10 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणुकीच्या पीठासन अधिकारी तथा ग्रामसेविका सौ.पाटील यांच्या अधिपत्याखाली घेण्यात आली.या निवडणुकीत उपसरपंच पदासाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याच्या वेळेत शेकापच्या सरीता खडतर यांचा एकमेव अर्ज दाखल झालेला होता.ग्रामपंचायत कार्यालयात दुपारी 1 वा.निवडणुकीच्या पीठासन अधिकारी तथा ग्रामसेविका सौ.पाटील यांनी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलावून सुरव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सरिता खडतर या बिनविरोध निवडून आल्याचे जाहीर करून त्यांचे विशेष अभिनंदन केले.तसेच माणगाव तालुक्यातील मोर्बा  येथील  शेकापचे जेष्ठ नेते अस्लमभाई राऊत,सहदेव बक्कम ,तालुका शेकाप चिटणीस रमेश मोरे,राष्ट्रवादी काँग्रेसच्या माणगाव तालुका महिला आघाडी अध्यक्षा संगीता बक्कम,सुरव ग्रामपंचायतीच्या सरपंच अलका जाधव,माजी सरपंच राजेंद्र जाधव,हरिओम जाधव,माजी ग्रामपंचायत सदस्य मधुकर अर्बन ,ग्रामपंचायत सदस्य समीर लहाने,नम्रता जाधव,स्वराली जाधव,सुषमा जाधव,खरवली ग्रामपंचायत उपसरपंच स्वप्नील सकपाळ,अजित भोनकर ,प्रशांत मोरे,दिलीप लहाने,बळीराम खडतर,ग्रामसेवक पाचाडकर,ग्रामस्थ मंडळी सुरव तर्फे तळे यांनी नवनिर्वाचित  उपसरपंच सरिता खडतर यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.  

अवश्य वाचा

सोलर दिव्यांनी शाळा उजळणार