मुंबई 

घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या किंमतीत बुधवारपासून (12 फेब्रुवारी) वाढ करण्यात आली आहे. एलपीजी गॅसच्या किंमतीत सलग सहाव्यांदा वाढ करण्यात आली आहे. दिल्ली आणि मुंबईमध्ये अनुक्रमे 144.5 आणि 145 रुपये प्रति सिलिंडरची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विना-अनुदानित सिलिंडर आता दिल्लीत 858.5 रुपये आणि मुंबईत 829.5 रुपये असे आहे, असं इंडियन ऑईल कॉर्पोरेशन म्हटलं आहे.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं डिसेंबर महिन्यात दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबई या शहरात अनुदानित एलपीजी गॅसवर 200 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर दोन महिन्यांतच विना अनुदानित एलपीजी गॅसच्या दरातही वाढ करण्यात आली आहे. साधारण प्रति सिलिंडर 145 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सरकारकडून वर्षाला 12 एलपीजी गॅसवर अनुदान दिले जाते. मात्र अतिरिक्त सिलिंडरसाठी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागतात. नव्या वाढीमुळे सर्वसामान्य माणसाच्या खिशाला आणखी झळ बसणार आहे.

तेल कंपन्यांनी बुधवारी घरगुती गॅसच्या किमतीत 144.5 रुपये प्रती सिलेंडरची वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेल्या किमतीमुळे देशातील गॅसच्या किमतीतही वाढ पाहायला मिळत आहे. आता 14.2 किलोग्राम एलपीजी सिलेंडर 714 रुपयांऐवजी 858.50 रुपये प्रती सिलेंडर असेल.

जानेवारी 2014 नंतर घरगुती सिलेंडरच्या किमतीत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. 2014 मध्ये गॅसच्या किमतीत 220 रुपयांची वाढ झाली होती. तेव्हा प्रती सिलेंडर 1241 रुये होता.

चौकटीत...

घरगुती गॅसवर अनुदाऩ वाढविले

सरकारने ग्राहकांना एक दिलासाही दिला आहे. घरगुती गॅसचा वापर करणार्‍यांना वर्षाला 12 सिलेंडरवर सबसिडी दिली जाईल. अधिकार्‍यांनी सांगितल्यानुसार, सरकार प्रत्येक सिलेंडरवर 153.86 रुपये सबसिडी देते, आता ही 291.48 रुपये केली आहे. पंतप्रधान उज्ज्वला योजना अंतर्गत मिळणारी सबसिडी 174.48 वरुन वाढून 312.48 प्रती सिलेंडर करण्यात आली आहे. यामुळे आता घरगुती गॅस वापरणार्‍यांना सबसिडी असलेले सिलेंडर 567.02 आणि पीएमयूवाय अंतर्गत 546.02 रुपयांना मिळेल. सरकारने गरीब महिलांना पीएमयूवाय योजनेअंतर्गत 8 कोटी फ्री गॅस कनेक्शन दिले आहेत.

 

अवश्य वाचा